Life imprisonment for the company owners murderer in aurangabad
Life imprisonment for the company owners murderer in aurangabad 
मराठवाडा

कंपनी मालकाचा खून करणाऱ्यास जन्मठेप 

सुषेन जाधव

औरंगाबाद : कामाचे पैसे दिले नाही म्हणून वाळूज एमआयडीसी परिसरातील कंपनीच्या 75 वर्षीय मालकाचा फावड्याने खून करणाऱ्या कामगाराला जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली. 

खुनाच्या घटनेनंतर काही दिवसांनी आरोपी स्वत: मुंबईच्या न्यायनगर पोलिस ठाण्यात हजर झाला होता व त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. गणेश येवले (रा. कौसल्यानगर, ता. हदगाव, जि. नांदेड, ह. मु. पंढरपूर, वाळूज एमआयडीसी) असे त्याचे नाव आहे. 

10 जुलै 2016 ला गणेश येवले याने मुंबईच्या न्यायनगर पोलिस ठाण्यात हजर होत, 'कंपनी मालक रामेश्‍वर दरक यांच्याकडे कामाचे पैसे मागण्यासाठी गेलो असता त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांच्याच वाळूज एमआयडीसी परिसरातील गोडाऊनमध्ये त्यांचा खून केल्याची' कबुली पोलिस ठाण्यात दिली.

प्रकरणात एम वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भास्कर खरात यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील राजू पहाडिया यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले.

यामध्ये घटनेदिवशी कंपनीत जाताना व येताना आरोपीला पाहणाऱ्या एकाची साक्ष महत्वपूर्ण ठरली. त्याच साक्षीदाराच्या नातेवाईकाच्या शिफारसीवरुन आरोपीला काम मिळाले होते व घटनेनंतर कंपनीच्या मालकाचा खून केल्याचे आरोपीने साक्षीदाराला सांगितले होते. दोन्ही बाजुंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT