file photo 
मराठवाडा

मेव्हणी फितूर; जावयाला जन्मठेप : औरंगाबाद शहरातील घटना

सुशेन जाधव

औरंगाबाद : शहरातील गरमपाणी परिसरात राहणाऱ्या सासऱ्यास स्टम्पने बेदम मारहाण करून खून करणाऱ्या जावयाला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी दोषी ठरवत जन्मठेप व पाच हजार रुपयांची शिक्षा सुनावली. साहेबराव गंगाधर महापुरे (रा. मस्के कॉलनी, पडेगाव) असे आरोपीचे नाव आहे. 

प्रकरणात सरिता गोरे यांनी तक्रार दिली होती. सासूबाईचे निधन झाल्यामुळे त्यांच्या तेरवीचा कार्यक्रम 8 सप्टेंबर 2016 ला होता. त्यामुळे आरोपी महापुरेसह चार जावई आणि मुली मध्यवर्ती बसस्थानकजवळ असलेल्या गरमपाणी येथे आल्या होत्या. रात्री जावई साहेबराव आणि सासरे बाबूराव देवराव जाधव (वय 65, रा. गरमपाणी) यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाला. तो वाद विकोपाला गेला आणि एकमेकांना शिवीगाळ करत होते. याचा राग आल्याने संतापलेला जावई महापुरेने घरातील लाकडी स्टम्प मारण्यासाठी घेतला.

सासरा पुढे आणि जावई मागे

जावई मारायला धावल्याचे पाहून सासरे बाबूराव हे घराच्या बाहेर पळू लागले. सासरा पुढे आणि जावई मागे पळत होते. गल्लीमध्ये जावई महापुरे याने सासऱ्याला अडवून स्टम्पने मारहाण केली. मध्यरात्री घटना घडल्यामुळे स्थानिक नागरिकांनी क्रांती चौक पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी बाबूराव जाधव यांना घाटी रुग्णालयात दाखल केले.

प्रकृती खालवल्यामुळे खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. उपचार सुरू असताना बाबूराव यांचा 14 सप्टेंबर 2016 ला मृत्यू झाला. जाधव यांची मुलगी सरिता गोरे यांच्या तक्रारीवरून साहेबराव महापुरे विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

गल्लीतील शेजारणीची साक्ष महत्त्वाची 

या खून खटल्याची अंतिम सुनावणी झाली असता मुख्य सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी 12 साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. मृताच्या तक्रारदार मुलीसह दोन जण फितूर झाले. जाधव यांच्या गल्लीतील शेजारी राहणाऱ्या महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली.

न्यायालयाने महापुरेला दोषी ठरवून जन्मठेप, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली. ऍड. देशपांडे यांना ऍड. सिद्धार्थ वाघ यांनी सहकार्य केले. पीएसआय डी. के. परळीकर यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election Nomination : पुणे महापालिका निवडणूक; पहिल्या दिवशी अर्ज भरण्याकडे उमेदवारांची पाठ!

आलिया- रणबीरच्या लग्नात 'या' गोष्टीच्या विरोधात होत्या नीतू कपूर; मुळीच आवडला नव्हता सुनेचा तो निर्णय

चित्रपट संस्कृतीचा मानदंड! २२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाची सुरूवात; कधी आणि कुठे होणार सोहळा?

Jemimah Rodrigues बनली कर्णधार, आता स्मृती मानधना, हरमप्रीत कौरलाही देणार टक्कर! तीन वेळा उपविजेत्या ठरलेल्या संघाचा मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : सदानंद दाते लवकरच महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक!

SCROLL FOR NEXT