Life imprisonment for woman for murder Nanded District Court result
Life imprisonment for woman for murder Nanded District Court result 
मराठवाडा

नांदेड : खूनप्रकरणी महिलेस जन्मठेप; जिल्हा न्यायालयाचा निकाल 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : पैशाच्या देवाण- घेवाणीतून घरात बोलावून एकाचा खून करणाऱ्या महिलेस येथील प्रमुख जिल्हा न्यायाधिश दीपक ढोलकिया यांनी सोमवारी (ता. 13) जन्मठेप व दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील परंतु सध्या सारखणी येथेच वास्तव्यास असलेला राहणारा सुरेश खेकार हा पैशाची देवाण- घेवाण करीत असे. त्याने सारखणी (ता. किनवट) येथील जनाबाई रमेश पवार (वय 45) या महिलेला पैसे दिले होते. यातून त्यांचा वाद होत असे. ता. 17 मे 2016 ला सुरेश खेकारे यांचा मुलगा कुणाल हा माहूरला गेला होता. तेथून त्याने आपल्या वडिलांना फोन लावला असता फोन लागत नसल्याने तो परत घरी आला. बाबा कुठे गेले असे त्याने आईला विचारले असता आईने सांगितले की, तुझे बाबा साकळी गेले ते अद्याप आले नाही. तेव्हा कुणाल हा गावात पाहण्यासाठी गेला असता जनाबाई पवार हिच्या घरातून वडिलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला, मात्र आत जाण्याची हिंम्मत नसल्याने तो तेथून निघून गेला. या दरम्यान जनाबाई पवार व तीच्या साथीदारांनी सुरशे खेकार याच्या डोक्यात जबर मारून खून केला. ही घटना ता. 18 मे 2016 च्या रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रमेश शामराव खेकारे यांच्या फिर्यादीवरुन जनाबाई रमेश पवार, गंगाबाई उत्तम चव्हाण, प्रफुल्ल उत्तम चव्हाण, दिनेश उत्तम चव्हाण यांच्याविरूध्द सिंदखेड पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. फौजदार आर. के. खरात यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक ढोलकिया यांनी या प्रकरणात 13 साक्षिदार तपासले. सरकार पक्षाची बाजू ॲड. रणजीत देशमुख यांनी मांडली. तर आरोपींचा बचाव ॲड. पी. एन. शिंदे यांनी केला. दोन्ही युक्तीवाद ऐकून न्यायाधिश ढोलकिया यांनी जनाबाई पवार हिला जन्मठएप व दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. तर गंगाबाई चव्हाण, प्रफुल्ल चव्हाण आणि दिनेश चव्हाण यांना सबळपुराव्या आधारे निर्दोष मुक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT