shete. 
मराठवाडा

...यांची उत्कर्षाची प्रकाशवाट डोळसांना थक्क करणारी

गणेश पांडे

परभणी ः जन्माने नशिबाला आलेल्या अंधत्वावर जिद्दीने मात करीत धनंजय शिवशंकर शेटे यांनी शोधलेली स्वत:च्या उत्कर्षाची प्रकाशवाट निश्चितच डोळसांना थक्क करणारी आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात मागील २२ वर्षांपासून ते आकलन शक्तीच्या जोरावर शासकीय कामकाज विना तक्रार पार पाडत आहेत.

जन्मताच अंधत्व पदरी आलेल्या धनंजय हे हिंगोली जिल्ह्यातील साखरा (ता.सेनगाव) येथील. वडील वैद्यकीय क्षेत्रातच कार्यरत होते. त्यामुळे घरात शैक्षणिकदृष्ट्या निश्चितच वातावरण चांगले होते. परंतु, धनंजय यांनी अंधत्वामुळे ब्रेललिपीतून शिक्षण घेतले. तत्पूर्वी त्यांच्या कुटूंबियांनी त्यांच्यावर दोन वेळा शस्त्रक्रीया केल्या. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पदरी निराशाच आली. एकापाठोपाठ दोन शस्त्रक्रिया झाल्या मात्र, दिसत नसल्याने त्यांचे आई-वडील काहीसे हिरमुसले. परंतु, धनंजय मात्र, नशिबी आलेल्या अंधत्वावर मात करण्यासाठी सज्ज झाले.

प्रत्येक काम एकाग्रतेने करण्यावर भर दिला
धनंजय यांचे वडील नेत्रचिकित्सक होते. स्वतः नेत्रचिकित्सक असतानाही मुलाचा विलाज होत नसल्याने ते तर प्रचंड अस्वस्थ होत होते. मात्र, धनंजयने जिद्द कायम ठेवली. ब्रेललिपित शिक्षण पूर्ण केले. यात एकाग्रता व आकलन शक्ती महत्वाची असल्याने त्यांनी सातत्याने हातात घेतलेले प्रत्येक काम एकाग्रतेने करण्यावर भर दिला. कामात सचोटी व एकाग्रता असेल तर कुठलेही ध्येय गाठता येत असल्याने धनंजय यांनी त्यांच्या कामातून समाजास दाखवून दिले. डोळ्याने जरी दिसत नसले तरी कान, स्पर्श आणि बुध्दी तल्लख ठेवत प्रत्येक गोष्टीवर मात केली. पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासकीय सेवेत दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी सातत्या कायम ठेवले. शासकीय सेवेत दाखल होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचीही तयारी केली असल्याचेही ते सांगतात.

टेलिफोन ऑपरेटर म्हणुन झाले भरती
१९९७-९८ ला जिल्हा शासकीय रुग्णालयात टेलिफोन ऑपरेटर पदासाठी भरती झाली. त्यात धनंजय यांनी आपल्या आकलशक्तीच्या जोरावर यश प्राप्त केले. परभणी शासकीय रुग्णालयात काही वर्षे सेवा केल्यानंतर त्यांची बदली जालना येथे झाली. तेथून पुन्हा ते परभणीत दाखल झाले. शासकीय रुग्णालय म्हटले की सतत कार्यरत राहणे गरजेचे असते. रुग्णालयात नेहमीच रुग्णांची वर्दळ, त्यांच्यासाठी लागणारे साहित्य मागवणे, त्याचबरोबर आलेले फोन कॉल स्वीकारणे, वेळप्रसंगी निरोप घेऊन ते अधिकाऱ्यांना व्यवस्थित देणे आदी कामे धनंजय यांनी लिलया पेलली. मागील २२ वर्षात विनातक्रार त्यांनी काम करत डोळस असलेल्यांनाही लाजवेल असे निष्ठेने व एकाग्रतेने काम करीत शासकीय कर्मचाऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

असाही दैवदुर्विलास
धनंजय यांचे वडील डॉ. शिवशंकर शेटे नेत्रचिकित्सक. मात्र, धनंजय यांना जन्मताच दिसत नसल्याने त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व प्रयत्न करीत शस्त्रक्रिया करीत त्यांना पुन्हा दृष्टी देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यात यश येऊ शकले नाही. परंतु, धनंजय यांनी स्वतःच्या पायावर उभे राहत, विना तक्रार सेवा बजावत बुध्दीने, मनाने व आकलन शक्तीने आपण डोळस व्यक्तींपेक्षा कमी नसल्याने दाखवुन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Love story Video : 'Hardik Pandya'चं नवं लफडं आलं बाहेर, टीम इंडियाच्या पेजवर एकमेकांना केली कमेंट; कोण आहे Mahieka Sharma?

Mumbai Crime: आधी अश्लील हावभाव, नंतर आरडाओरड करताच रिक्षातून बाहेर ढकलल अन्...; चालकाचं मुलीसोबत धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : उल्हासनगरात सराईत गुंडावर चाकू हल्ला, सीसीटीव्ही फुटेज आला समोर

Google Search Trends: 2025 मध्ये भारतीयांनी गुगलवर सर्वाधिक सर्च केले 'हे' आजार, संपूर्ण लिस्ट एकदा पाहाच

भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील ४ सामन्यांना स्टार फलंदाज मुकणार; प्रतिस्पर्धी संघाची झाली गोची... फ्रँचायझी लीगला महत्त्व

SCROLL FOR NEXT