फोटो 
मराठवाडा

विजेचा धक्‍का लागून दोघांचा मृत्‍यू 

राजेश दारव्हेकर

वसमत (जिल्हा हिंगोली) : येथील कृष्णा मंगल कार्यालयात कामानिमित्त लोखंडी शिडी ढकलत घेऊन जात असताना मुख्य वीज वाहिनीच्या तारेला स्पर्श झाल्याने दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. सात) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसमत - परभणी मार्गावर गणेशपूर शिवारातील कृष्णा मंगल कार्यालयात काही कामे सुरू आहेत. कार्यालयातील व्यवस्‍थापक विलास पतंगे (वय ५७) व सेवक सिद्धार्थ केशव वाघमारे (वय ३५) हे दोघे कामानिमित्त लोखंडी उंच शिडी मंगल कार्यालयाच्या गेटमधून ढकलत आतमध्ये नेत असताना वरच्या भागातून जाणाऱ्या मुख्य वीज वाहिनीला अनावधानाने लोखंडी शिडीचा स्पर्श झाला. आणि यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 

रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेले
या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना कळताच त्यांनी तातडीने पोलिसात हा घडलेला प्रकार सांगितला. 
त्यामुळे तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वीज वितरणला कंपनी सांगून विजेचा प्रवाह बंद केल्यानंतर मृत्यू झालेल्या दोघांना बाजूला काढत रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात नेले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी रुग्णालयात हलविण्यात आला. या बाबत वसमत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात 

हिंगोली :  तक्रारदाराच्या नावे असलेल्या वसमत तालुक्‍यातील खांडेगाव येथील गट क्रमांक १२२ मधील 
प्लॉटवर बांधलेल्या घराची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला घेऊन नमुना नंबर आठ देण्यासाठी पाच हजाराची लाच मागितल्याचे स्पष्ट होताच ग्रामसेवकावर वसमत पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.6) गुन्हा दाखल झाला आहे.

वसमत पंचायत समिती येथील खांडेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गणेश माणिकराव सुळ हे तक्रादाराच्या नावे असलेल्या प्लॉटवर बांधकाम केल्याची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला, व नमुना नंबर आठ देण्यासाठी पाच हजाराची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदारांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून सोमवारी (ता.) ग्रामसेवकाविरुद्ध तक्रार दिली. तक्रार मागे घेण्यासाठी ग्रामसेवक गणेश सुळ यांनी तक्रादाराला तगादा लावत होते. या तक्रारदाराची लाचलूचपत विभागाने पडताळणी केल्यानंतर ग्रामसेवक गणेश सुळ हे पदाचा गैरवापर करीत असल्याचे स्पष्ट दिसून आल्याने मंगळवारी त्याच्याविरुद्ध वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पावनेदोन लाख एटीएममधून लंपास

वसमत- येथील नांदेडरोड भागात असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या सेवानिवृत कर्मचाऱ्याच्या खात्यातून एकाने एटीएमद्वारे एक लाख ७० हजार रुपयाची रक्‍कम परस्पर काढल्याची घटना सोमवारी (ता. सहा) घडली आहे. 

कुरुंदा येथील श्रीराम फेदराम (वय ६६) हे दुपारी दोन वाजता पैसे काढण्यासाठी आले होते. यावेळी त्‍यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या एका अज्ञाताने तुम्‍ही काढलेल्या पैशाची स्‍लीप काढून देतो असे म्‍हणून त्‍यांच्याकडून एटीएमकार्ड घेतले. तसेच एटीएम पीन क्रमांक पाहून दुसरे डुप्लीकेट एटीएमकार्ड 
त्यांना वापस दिले. त्‍यानंतर त्‍यांच्या खात्यावरील एक लाख ७० हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी श्रीराम फेदराम यांच्या फिर्यादीवरून वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT