vruksha.1.jpg 
मराठवाडा

पर्यावरण रक्षणासाठीच्या संकल्पाला कृतीची जोड

सकाळ वृत्तसेवा

सेनगाव ः नवीन वर्ष सुरू होण्याआधीच प्रत्येकजण काही ना काही संकल्प करत असतो. पण केलेला संकल्प पुर्ण करण्यासाठी फार कमी जण प्रयत्न करतात. मात्र, याला अपवाद ठरले आहे येथील सामाजिक कार्यामध्ये सदैव तत्पर असणारे सई फाऊंडेशन. या सामाजिक संस्थेमार्फत मागील वर्षापासून पर्यावरण रक्षणासाठी मिशन वृक्षलागवड ही मोहीम हाती घेण्यात आली होती. नववर्षात फुले जयंतीपासून वृक्षारोपण करून या बाबत जनजागृती सुरू करून त्यांनी संकल्पाला कृतीची जोड दिली आहे. 

सेनगाव येथील सई फाऊंडेशन समाजपयोगी उपक्रम रावबित असते. या संस्‍थेचे संस्‍थापक विकास कोकोटे यांनी मुलीच्या प्रत्‍येक वाढदिवसानिमित्त मागच्या काही वर्षांपासून अनाथ, मुकबधिर व पालावरच्या मुलांना कपडे, शैक्षणिक साहित्य, जेवन व फराळ वाटप, पालावरील गरजू महिलांना साडी वाटप, ब्लँकेट वाटप आदी सामाजिक कार्यक्रम घेतले होते. या वर्षी सामाजिक कार्यासोबतच पर्यावरण रक्षणाचा उपक्रम फाऊंडेशनतर्फे राबविण्यात आला.

मुलीच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
मुलगी पुर्वजा हिच्या सातव्या वाढदिवसानिमित्त सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच बालिका दिवसाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय व मातोश्री लक्ष्मीबाई येवले विद्यालयामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. येथे विविध प्रकाराची झाडे लावण्यात आली या झाडांचे संगोपन करण्याचा निर्णय शाळा व रुग्णालय प्रशासानाने घेतला आहे. यावर्षी देखील सामाजिक कार्यासोबतच पर्यावरण रक्षणाचा उपक्रम फाऊंडेशनतर्फे राबविण्यात आला आहे.

यांच्या हस्ते झाले वृक्षारोपण
ग्रामीण रूग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन राठोड, डॉ. श्रीमती बोकडे तर येवले विद्यालयात मुख्याध्यापक विजय येवले, उत्तम घुगे, पुर्वजा कोकाटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी गोपाल जारे, निखिल घुगे, ग्रामीण रूग्णालयाचे गणेश जारे, गणेश खोडके, गजानन झागरे, बालू आडे, जे. टी गिते, आर. बी. वाघमारे, पी. एस. शिंदे, व्ही. आर. गुगळे, आर. डी. कोकाटे, पी. एन. काळपे यांच्यासह सई फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


जनजागृती सुरूच ठेवण्याचा संकल्प
सई फाऊंडेशन अविरत सामाजिक व पर्यावरण पुरककार्याची जनजागृती सुरूच ठेवण्याचा नवीन वर्षाचा संकल्प केला असून पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षारोपणाची जनजागृती करणार आहे.
-विलास कोकोटे. 

हिंगोलीत वृक्षप्रेमी मंडळाचा‘एक घंटा झाडांसाठी’ उपक्रमhttps://www.esakal.com/marathwada/students-curious-about-police-information-249977
शहरात मागच्या काही दिवसांपासून वृक्षप्रेमी मंडळातर्फे दर रविवारी सुरू असलेला ‘एक घंटा झाडांसाठी’ हा उपक्रम शहरातील कानाकोपऱ्यात पोहचला असून दर रविवारी येथे गर्दी होत आहे. कडाक्‍याच्या थंडीत देखील शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक यात सहभागी झाले होते. 
शहरातील वृक्षप्रेमी मंडळींनी एकत्र येत रेल्‍वेस्‍थानक परिसरातील मोकळ्या मैदानावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. त्‍यांना यासाठी रेल्‍वेस्‍टेशन मास्‍टरतर्फे येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली. त्‍यानंतर येथे साफसफाई करून वृक्षलागवड केली जात असून त्‍याला काटेरी कुंपनाचे संरक्षण घातले जात आहे. यात शाळा, महाविद्यालय, गुरूकुलातील विद्यार्थ्यांसह वृक्षप्रेमी मंडळी सहभागी झाले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT