ganjewar.jpg 
मराठवाडा

संकटाच्या अंधारात पेटला...अपेक्षेचा दिवा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : मानवी जीवन जगत असताना समाजाला आपण काहीतरी देणं लागतं हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रितम नंदकुमार गंजेवार व गजानन नंदकुमार गंजेवार यांनी समाजाभिमुख नवनवीन उपक्रम राबवून जनसामान्यांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न त्यांच्या हातून करण्यात येत आहे. 

समाजोपयोगी कार्य
रक्तदान शिबीर, सुकन्या सायकल वाटप, कोल्हापूरमधील पूरग्रस्तांना शालेय साहित्य वाटप, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, सामाजिक कार्य करणार्या समाजातील व्यक्तींना AVKSM जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करणे, स्त्रीशक्तीतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ‘होम मिनिस्टर फेम’ प्रोग्राम, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला, तिरुपती श्रावणबाळ यात्रा विमानाने, समाजातील आर्थिक दुर्बल घटकांचा शैक्षणिक खर्च, निराधार बांधवांना मदत आदी उपक्रम राबून सर्वसामान्य कुटुंबांनी घरोघरी जाऊन मदत करण्याचा त्यांनी विडा उचलला आहे. 

हेही वाचा....

निराधार लोकांना दिला आधार
‘टाकल्या पाण्याने गंगा वाहत नाही’ या उक्तीप्रमाणे ना लाभ, ना कोणतीही शासकीय मदत गोरगरीब जनतेला मदत मिळाली नाही. अनेक निराधारानी शेवटी मायबाप सरकारच्या दारावर हाक मारून तब्बल वर्षभर शासकीय प्रशासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले परंतु कोणतीही योजनेचा लाभ मिळाला नाही. मात्र हलाखीचे जीवन जगणाऱ्या अन टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या कष्टकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली. 

हेही वाचलेच पाहिजे.... 

गरीबांच्या मदतीला आले धावून
जनसामान्यांच्या मदतीला नेहमीच ओ देऊन दुःखितांचे अश्रू पुसल्याबद्दल अनेक संवेदनशील मने गंजेवार बंधूचे आभार व्यक्त करत आहे. खऱ्या अर्थाने या गरीब निराधार कुटुंबांना प्रितम नंदकुमार गंजेवार व गजानन गंजेवार यांनी  जगण्याची नवी उमेद देऊन संकटाच्या अंधारात अपेक्षेचा दिवा पेटल्याचा अल्हाद निर्माण करणारे त्याचे कार्य आहे.

लॉकडाऊनमध्ये गरुजूंना भाजीपाला वाटप 
दीपनगर परिसरातील काही दानशूर व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने पैसे गोळा करून भाजीपाला विकत घेत गरीब वस्त्यांमध्ये वाटप केला. सध्या लोकडाऊनच्या काळात बरेच मजूर, नागरिक शहराच्या विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. तसेच हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. शासन त्यांच्या परीने मदत करीतच आहे. यात आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून शहरातील दीपनगर परिसरातील काही नागरिकांनी उस्फुर्तपणे समोर येत पैसे गोळा करून भाजीपाला विकत आणला. शहरातील वजिराबाद, विष्णुपुरी, महाराणा प्रताप चौक आदी भागात तो गरीबांना वाटप केला. यावेळी श्री. धिमधीमे, रोहन धनजकर, संतोष पवार, मंगेश डांगे, बंटी केरूरकर, लखन नारखेडे, मुकुंद धानोरकर, संतोष भालेराव, रमेश वाघमारे आदींनी सहभाग घेतला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT