संग्रहित चित्र. 
मराठवाडा

कोरोनाचाच तमाशा, कलावंतांची फरपट 

अरुण ठोंबरे

केदारखेडा (जि.जालना) -  कोरोनाचा खेळ सुरू झाल्याने तमाशाचे फड मात्र बंद झाले आहेत. कामेच नसल्याने कलावंतांची फरपट सुरू झाली आहे. उधारी, उसनवारी करून, चार घरांतून धान्य गोळा करून कसाबसा दिवस ढकलावा लागत आहे. 

भोकरदन तालुक्यातील बामखेडा येथे पन्नास ते साठजण तमाशाच्या फडात कलाकार म्हणून काम करतात. सध्या कोरोनामुळे लॉकडाउन सुरू आहे. लोकनाट्याचे फडही मार्चपासून बंद आहेत.

कलाकारांना कामेच राहिलेली नाहीत. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून हे कलाकार घरी बसून आहेत. उधारी, उसनवारी करून, चार घरांतून धान्य गोळा करून उदरनिर्वाह सुरू आहे.

मध्यंतरी लोकनाट्य मंडळाच्या मालकाने काहीशी मदत केली. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. आता पुढील दिवस कसे काढायचे, या विवंचनेत कलावंत आहेत. प्रशासनाने कलावंतांना मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

कला सादर करता येईना, भीकही मागू वाटेना अशी स्थिती आहे. परिणामी उपासमारीची वेळ आली आहे. तमाशाच बंद झाल्याने कलावंतांना कामे नाहीत. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही. अशावेळी प्रशासनाने मदतीसाठी विचार केला पाहिजे. 
- काजल जाधव, 
कलावंत 

लोकनाट्याचे फड बंद आहेत. आता गाठीशी असलेला पैसा संपला आहे, धान्यही उरलेले नाही. त्यामुळे कलावंतांचे हाल सुरू झालेले आहेत. प्रशासनाने कलावंतांना मानधन, धान्य उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. 
- अग्निपथ पवार, 
कलावंत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेसेनेला पुन्हा मोठा धक्का! महिनाभरात अजून एका बड्या नेत्याचं पद रद्द; राजकीय समीकरणं बदलणार

आता AI ठरवणार संघात कोणाला संधी मिळणार! क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानाचा नवा अध्याय; आकडेवारीपासून थेट संघ निवडीसाठी वापर होणार

आनंद शिंदेंच्या आवाजातील 'गोमु सासरला जाते' गाण्याचा धुमाकूळ; 'भुतम भयम'मधील गावरान ठसक्यातील गाणं ऐकलंत का?

Latest Marathi News Live Update : तुळजाभवानी मंदीरातील पेड दर्शन बंद करण्याची मागणी

Vat Purnima 2026: घराजवळ वडाचं झाड नाहीये? मग 'अशी' करा घरच्या घरीच वटपौर्णिमेची पूजा; जाणून घ्या सोपा उपाय

SCROLL FOR NEXT