Nanded News
Nanded News 
मराठवाडा

Video-लॉकडाऊन : घरात बसून तरुणाई म्हणतेय ‘मुस्कुराएगा इंडिया’

प्रमोद चौधरी

नांदेड : काही दिवसांपूर्वी कोरोना संक्रमित लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी बॉलीवूडमधील सर्व दिग्गज कलाकारांनी आपापल्या घरातून एक व्हिडिओ शूट करून ‘मुस्कुराएगा इंडिया’ हे गाणं तयार केले होते. यामध्ये अक्षय कुमार, आयुष्मान खुराना, टाइगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, अनन्या पांडे, कृति सेनन, तापसी पन्नू आणि राजकुमार राव यांच्या सारखे सेलिब्रिटी आहेत. असाच एक व्हिडिओ महाष्ट्रातील युवक आणि युवतींनी तयार केला आहे. 

तीन मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आल्यानंतर घरात बसून अनेकजण वेगवेगळ्या क्रीटीव्हिटी करून आपला वेळ घालवत आहेत. ‘मुस्कुराएगा इंडिया’ हे गाणं सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर या गाण्यावर वेगवेगळ्या शहरात राहणारे मित्र मैत्रिणी हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत आहेत.  असाच एक व्हिडिओ सध्या महाराष्ट्रातील काही तरुणांनी केला असून सोशल मीडियावर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

नांदेडच्या युवतीची संकल्पना
कोरोना विषाणुमुळे सर्वचजण तणावामध्ये आहे. अनेकजण विविध माध्यमातून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. तसाच प्रयत्न महाराष्ट्रातील काही युवक-युवतींनी केला आहे. कोरोना संक्रमित तसेच भयभीत असलेल्यांसाठी नांदेडच्या कोमल ढवळे हिच्या संकल्पनेतून ‘मुस्कुराएगा इंडिया’ हा व्हिडिओ बनवला आहे. त्यामध्ये मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथील मित्रांनी आपापल्या घरातून व्हिडिओ शूट केला आहे. यामध्ये सचिन मेश्राम, अस्मिता साबळे, डीजे प्रविणा गिराम, माधुरी लोकरे, रेश्मा शेख, सार्थक कुलकर्णी, विशाखा दिवार, विशाल भोगले यांचा समावेश असून, हा संपूर्ण व्हिडिओ स्वप्नील कापसे यांनी एडिटींग केला आहे. 

प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न
आम्ही लॉकडाउन काळात काळात प्रशासनाचे सर्व नियमांचे पालन करत आहोत. या काळात कोरोना संक्रमित लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी घरीच बसून काहीतरी करण्याचा विचार होता. ‘मुस्कुराएगा इंडिया’ हे गाणं पाहून आपणही असे गाणं बनवावं असा विचार आला आणि सर्व मित्रांना कॉल करून आम्ही हे गाणं बनवलं. लवकरच या कोरोना संकटातून बाहेर पडून ‘मुस्कुराएगा इंडिया’ म्हणत सर्वांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करत आहोत. 
- कोमल ढवळे, नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: फिलिप सॉल्टची तुफानी फटकेबाजी, दिल्लीविरुद्ध ठोकलं आक्रमक अर्धशतक

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT