जालना ः दहा दिवसांच्या कडक लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर रोडमार्च करताना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक चैतन्य एस., मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा. 
जालना ः दहा दिवसांच्या कडक लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर रोडमार्च करताना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक चैतन्य एस., मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा.  
मराठवाडा

जालनेकरांसाठी दहा दिवसांचा लॉकडाउन लागू

सकाळ वृत्तसेवा

जालना -  वाढलेल्या कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जालना शहरात दहा दिवस कडक लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्यांना सशर्त परवानगी असणार आहे.

दरम्यान, या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक चैतन्य एस., मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, पालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी पोलिस पथकांसह रविवारी (ता.पाच) रोड मार्च करून जनतेला लॉकडाउन पाळण्याचे आवाहन केले.

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्‍थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवकांशी चर्चा करून औद्योगिक वसाहतीचे क्षेत्र वगळता संपूर्ण शहरात दहा दिवस कडक लॉकडाउनचे आदेश दिले आहे. या काळात अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्यांना नियमांसह परवानगी दिली आहे. या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कायदेशीर तसेच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

रविवारी रात्री बारा वाजल्यापासून या लॉकडाउनला सुरवात झाली असून, ता.१५ जुलैपर्यंत तो कायम राहणार आहे. या काळात शहरातील नागरिकांचे आरोग्‍य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 

दहा शहरात दिवस नो एंट्री 

विशेष परवानगीशिवाय कोणालाही शहरात किंवा शहराबाहेर जाता येणार नाही, नागरिकांना केवळ वैद्यकीय आणि अंत्यविधीसाठी ऑनलाइन प्रवासाची परवानगी मिळणार आहे. अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल व डिझेल देण्यासाठी पंप सुरू राहणार आहे. तर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीचे ओळखपत्राच्या आधारे परवानगी असणार आहे. 

या सेवा राहतील सुरू 

वैद्यकीय सेवा, वर्तमानपत्रे व माध्‍यमांविषयक सेवा, सर्व शासकीय कार्यालये, शहरातील सर्व बॅंकांचे कार्यालयीन कामकाज (ग्राहकाला बॅंकेत येण्‍यास प्रतिबंध), जिल्हा न्‍यायालयीन कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी परवानगी राहील; तसेच फिरत्या दूधविक्रेत्यांना घरपोच दूध विक्रीसाठी सकाळी सात ते साडेनऊदरम्यान परवानगी राहणार आहे. मात्र, एका ठिकाणी उभे राहून दूध विक्री करता येणार नाही. जारद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्यांना रिकामे जार परत नेता येणार नाही, मोकळ्या भांड्यात पाणी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तसेच त्यांच्याकडे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. पास असलेल्या वितरकांना घरगुती गॅस सेवा देता येणार आहे. विद्युत, दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्राधारे परवानगी देण्यात आली आहे. वैद्यकीय कर्मचारी व औषधी विक्रेत्यांना दवाखान्‍याचे ओळखपत्र किंवा ऑनलाइन पासद्वारेच शहराअंतर्गत प्रवासास परवानगी आहे. सर्व प्रकारच्या मालवाहतुकीस व शहराच्‍या हद्दीतील गोदामे चालवण्‍यास परवागी राहणार असून हमालांना ओळखपत्र देणे गरजेचे आहे. शासकीय कापूस व मका खरेदी केंद्र सुरू राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT