file photo
file photo 
मराठवाडा

लाॅकडाऊनचा फटका: वसमतमध्ये टरबूजाची पाच रुपये किलोप्रमाणे बांधाहून विक्री; शेतमालाची थट्टा 

प्रभाकर बारसे

गिरगाव ( जिल्हा हिंगोली ) : वसमत तालुक्यातील गिरगाव येथे टरबुजाची लागवड अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. काही शेतकऱ्याची टरबूज विक्री देखील सुरु झाली आहे. नेमके त्याची तोडणी सुरु होताच जिल्ह्यात सात दिवस लाॅकडाऊन सुरु झाल्याने मागच्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील फटका बसल्याने पाच रुपये किलोप्रमाणे शेतातून विक्री करावी लागत आहे.

मागच्या वर्षी कोरोना संकटाने मार्च महिन्यात संचारबंदी लागु करण्यात आली होती. यामुळे भाजीपाला व टरबूज पिकाचे नुकसान झाले. याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. या वर्षी पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लाॅकडाऊन संचारबंदी लागू असल्यामुळे यांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गिरगावसह परजना, खाजमापुर वाडी, बोरगाव खुर्द, सोमठाणा, पार्डी बुदुक, डिग्रस खुर्द आदी गावातील शेतकऱ्यांनी टरबूजाची लागवड आक्टोंबरमध्ये केली होती. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भाव झाल्याने लाॅकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे सर्वत्र बाजार बंद होते.

यामध्ये टरबूजाचे व्यापारी खरेदीसाठी पुढे येत नव्हते. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. यावेळी पण तीच परिस्थिती उद्भभवली असून जिल्ह्यात सात दिवस संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे टरबूज पिकांचे व्यापारी वर्ग खरेदी करीत नसल्याने शेतकर्‍याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यात काही व्यापारी तीन ते चार रुपये किलोप्रमाणे खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना त्याची विक्री करण्याऐवजी शेतातून पाच रुपयाप्रमाणे विकत आहेत. यासाठी व्हाँटसपचा उपयोग शेतकरी करीत आहेत. यामुळे ग्राहकसुद्धा शेतात जाऊन टरबूज खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. 

एका एकरात टरबूजाची लागवड केली होती यात लाँकडाऊन संचारबंदी मुळे व्यापारी  खरेदी करीत नसल्याने त्याचा फटका बसल्याने व्हाँटसप ग्रुपाचा उपयोग घेऊन शेतातून  पाच रुपये किलो प्रमाणे विक्री करणे सुरू केल्याने त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- माधव बेंडे, शेतकरी, गिरगाव, ता. वसमत.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT