file photo 
मराठवाडा

‘लॉकडाऊन’ने खासगी दवाखाने बंद

गणेश पांडे

परभणी : ‘कोरोना’ विषाणुचा प्रादुर्भाव झाल्यामुळे केंद्र सरकारने ‘लॉकडाऊन’ जाहीर केले आहे. या ‘लॉकडाऊन’मुळे व विषाणुचा संसर्गाच्या भितीने शहरातील खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद केले आहेत.

परंतू साध्या-साध्या आजारासाठी कोणत्या डॉक्टरकडे जावे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतांनाही अनेक दवाखाने शुक्रवारी देखील बंदच असल्याचे निदर्शनास आले.
‘कोरोना’ संकटाच्या काळात खासगी रुग्णालये बंद ठेवु नका, असे शासन सांगत असले तरी परभणी शहरातील बहुतांष खासगी रुग्णालये बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे त्या विशेष तज्ज्ञांची मेडीकल दुकाने देखील बंद राहत असल्याने रुग्णांना काही ठरावीक मेडीकल दुकानासमोर रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. 

बाह्यरुग्ण तपासणी बंद
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाला तेव्हापासून शहरातील काही खासगी रुग्णालयांनी बाह्यरुग्ण तपासणी बंद केली आहे. गर्दी टाळणे गरजेचे असले तरी सरसकट लॉकडाऊन केल्याने आजारी व्यक्तींचे हाल सुरु झाला आहेत. काही तज्ज्ञांनी तपासणी सुरु केली आहे. परंतु काही विशेष तज्ज्ञांनी रुग्णालये बंद केली असल्याने त्यांच्याशी निगडीत मेडीकल दुकाने देखील बंद राहत आहेत. त्याचा परिणाम म्हणून त्या तज्ञांकडून या आधी तपासणी करुन गेलेल्या रुग्णांना पुन्हा औषधी घेण्यासाठी विविध दुकाने फिरावे लागत आहे. बसस्थानक परिसरात काही मेडीकल औषधी दुकानावर जवळपास सर्वच प्रकारची औषधी मिळत असल्याने अशा दुकानावर रांगा लागत आहेत.


गर्दी टाळण्यासाठी खासगी रुग्णालये सुर ठेवा
शहरातील काही मोठी खासगी रुग्णालये सुरु आहेत. मात्र, अन्य विशेष तज्ज्ञांची रुग्णालये बंद असल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.`त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात बाह्यरुग्ण तपासणीसाठी गर्दी होत आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे संशयीत रुग्ण असल्याने त्याठिकाणी पुन्हा गर्दी होत आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी शहरातील खासगी विशेष तज्ज्ञांनी रुग्णालये सुरु करावीत, अशी मागणी होत आहे.
 

बहुतांश दवाखाने सुरु 
आम्ही जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना दवाखाने सुरु ठेवण्याच्या सुचना केल्या आहेत. परंतू छोट्या दुखण्यासाठी डॉक्टरांकडे गर्दी करू नका असे आम्ही आवाहन केले आहे. बहुतांश दवाखाने सुरु आहेत.
- डॉ. बी. एम. मोरे, अध्यक्ष आयएमए परभणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT