Prof Suresh Birajdar Sakal
मराठवाडा

लोकसभा निवडणूकीची उमेदवारी अद्याप निश्चित नाही; कार्यकर्त्यांनी संयम बाळगण्याचे प्रा.सुरेश बिराजदार यांचे आवाहन

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. अनेक कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी, सोशल मीडिया व इतर माध्यमावर आक्रमक व चुकीच्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.

अविनाश काळे

उमरगा : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. अनेक कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी, सोशल मीडिया व इतर माध्यमावर आक्रमक व चुकीच्या पद्धतीने व्यक्त होत आहेत.

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जो निर्णय घेतील, त्याचे पालन करत मतदारसंघाच्या हितासाठी महत्वाचा असेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.सुरेश बिराजदार यांनी सांगितले.

प्रा. बिराजदार लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहेत, गेल्या आठ ते दहा महिन्यापासुन संपूर्ण मतदार संघ त्यांनी पिंजुन काढला आहे. बार्शी ते शिर्सी इतपर्यंत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.

एक निष्कलंक, मितभाषी व्यक्तीमत्व म्हणुन त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल असे वातावरण होते. मात्र गेल्या चार दिवसापासुन दुसऱ्याच उमेदवारांची नाव बाहेर येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त होत आहेत. या संदर्भाने प्रा.बिराजदार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आपले नेते असुन त्यांचा आदेश आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे. सोशल मीडिया, वृत्तपत्र, वाहिन्या इत्यादीवर प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या आधारावर चुकीचा निर्णय अथवा चुकीचे पाऊल उचलू नये. अजित पवार जो निर्णय घेतील तो देशाच्या, राज्याच्या व धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या हिताचा असणार आहे. असे त्यांनी आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT