lok sabha election money laundering police squad check post politics Sakal
मराठवाडा

स्थिर सर्व्हेक्षण पथक गैरसोयीच्या विळख्यात

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पैशांची अवैधरित्या होणारी वाहतूक रोखण्यासाठी विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारून वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे.

दिलीप गंभिरे

कळंब : लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पैशांची अवैधरित्या होणारी वाहतूक रोखण्यासाठी विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारून वाहनांची झाडाझडती घेतली जात आहे. यासाठी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात ३० पथकाच्या माध्यमातून २४ तास पथकांची नजर राहणार असून सद्या कडक उन्हाचे चटके या स्थिर सर्व्हेक्षण पथकाला सहन करावे लागत आहे.

पथकासाठी तडपत्रीची झोपडी बांधून देण्यात आली आहे. यात कुलर आदीची सोय नसल्याने पथक घामाघूम होत असून गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पथकाच्या झोपडीत कुलर, डेझर्ट कुलर आदी इलेक्ट्रिकल साहित्य पुरविण्याचे कंत्राट नाशिक येथील लोखंडे इलेट्रिकल्स कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.

उस्मानाबाद लोकसभेची निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून निवडणूक आयोगाची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रात ३० स्थिर सर्व्हेक्षण पथकाची नियुक्ती करन्यात आली आहे.

दिवसरात्र पथक कार्यरत असणार आहेत. प्रत्येक ठिकाणी निवडणूक व पोलिस कर्मचारी, व्हिडिओ ग्राफर असे चार कर्मचारी त्या पथकात असतील. या पथकाकडून वाहने तपासली जात आहेत. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, शस्त्र, मद्य आदी अवैध रित्या होणाऱ्या वाहतुकीवर या पथकाची करडी नजर राहणार असून गैरप्रकार आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल केला जात आहे.

पथकाला गैरसोयीचा सामना करावा लागतो;

उस्मानाबाद लोकसभा निवडणूकित गैरप्रकार रोखण्यासाठी या पथकाची जबाबदारी आहे. त्यांना दिवसरात्र डोळ्यात तेल ओतून काम करावे लागत आहे. उमरगा लोहारा विधानसभा मतदार संघात तलमोड, कसगी, केसरजवळगा, कवठा, सास्तुर, कोथळी. तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोरी,

ढेकरी, खानापूर पाटी, नळदुर्ग गोलाई चौक, तामलवाडी, भंडारी, शिवली पाटी, उस्मानाबाद धाराशिव वैराग मार्ग चीलवडी चौक, येडशी बार्शी रोडवर वनराई हॉटेल समोर, धाराशिव औसा रोडवर सुतमिल गिरणी, धाराशिव बार्शी रोडवर जाधववाडी रोड हनुमान चौक, ढोकी चौरस्ता, परळी रोड कळंब, कळंब लातूर रोड रांजणी,

कळंब येरमाळा रोड येरमाळा, परंडा मतदार संघातील ईट ते जातेगाव रोड, नळी वडगाव फाटा, माणकेश्वर भांडगाव रोड, चौसाळा पारगाव रोडवरील जुना टोल नाका, तेरखेडा, कळंब मांडवा रोड वरील मांडवा, अनाळा (जामखेड), वारदवाडी बार्शी रोड, लोहारा कुडूवाडी रोड, रोसा करमाळा रोड या ठिकाणी स्थिर सर्व्हेक्षण पथकाची नियुक्ती केली आहे. पथकाच्या झोपडीत कुलर, डेझर्ट कुलरची सोय नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

आचारसंहिता संपल्यावर पथकाच्या झोपडीत कुलर लावणार का?

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार रोखण्यासाठी स्थिर सर्व्हेक्षण पथकाची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी झोपडी बांधली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे उकाडा असाह्य होत आहे. कुलर, डेझर्ट कुलर झोपडीत लवण्यासाठी निवडणूक विभागाने नाशिक येथील लोखंडे इलेक्ट्रिकल कंपनीला कंत्राट दिले आहे. आचारसंहिता संपल्यावर ही कंपनी पथकाच्या झोपडीत कुलर डेझर्ट कुलर लावणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission PC: मतचोरीच्या आरोपांवरून देशभर गदारोळ; निवडणूक आयोगाचा पत्रकार परिषदेत पलटवार! म्हणाले...

India Independence Day : विविध देशांमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; बीजिंगमधील कार्यक्रमात दोन चिनी नेत्यांची उपस्थिती

Crop Damage: फुलंब्री तालुक्यात ढगफुटीसदृश पावसामुळे मका, कपाशी व तूर पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांची चिंता वाढली

Trump Putin Meet : अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन, ट्रम्प-पुतीन भेट; अलास्काच्या वारशाचा पुतीन यांच्याकडून उल्लेख

Nashik Water Project : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी ३०७ कोटींची पाणीपुरवठा योजना पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT