Sujat Ambedkar sakal
मराठवाडा

Sujat Ambedkar : अशिक्षित उमेदवारावरून टीका करणाऱ्या MIM ला सुजात आंबेडकरांनी सुनावलं; म्हणाले, ‘असा सुशिक्षित खासदार काय कामाचा’

मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही एक सुशिक्षित पत्रकार मुस्लिम खासदार म्हणून मागच्या निवडणुकीत निवडून आणला. परंतू हेच खासदार मुस्लिमांचे शत्रू असल्यासारखे वागले.

सकाळ वृत्तसेवा

दौलताबाद - मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही एक सुशिक्षित पत्रकार मुस्लिम खासदार म्हणून मागच्या निवडणुकीत निवडून आणला. परंतू हेच खासदार मुस्लिमांचे शत्रू असल्यासारखे वागले. राम मंदिर दंगल असो की आपसातील भांडणे असो, या खासदाराने गृहमंत्र्याला हाताशी धरून मुस्लीम वस्त्यांमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबवायला लावले, अशी घणाघाती टीका वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केली. छत्रपती संभाजीनगरमधील दौलताबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत त्यांनी ही टीका केली.

वंचित बहुजनचे उमेदवार आशिक्षित असल्याची टीका एमआयएमकडून केली जात आहे. या टीकेचा सुजात आंबेडकर यांनी बुधवारी दौलताबादमधील सभेत समाचार घेतला. "हिंदू मुस्लीम दंगली भडकवण्याचे काम आम्ही निवडून आणलेल्या खासदाराने केले. असा शिक्षित खासदार काय कामाचा.” छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीने अफसर खान यासिन खान यांना उमेदवारी दिली आहे.

यावेळी व्यासपीठावर तालुका अध्यक्ष अंजन साळवे, शेख लाला, शेख बाबा, सागर तुपे, किरण साळवे, सुरेश गायकवाड माहील अध्यक्षा रुपाली अशोक शेजवळ आदी नेते यावेळी उपस्थित होते. औरंगाबादच्या नामांतरावरूनही सुजात यांनी जलील यांना चिमटे काढले. आम्ही निवडून दिलेल्या खासदारांना औरंगाबाद नाव वाचवता आले नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका करताना सुजात आंबेडकर म्हणाले, शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या काळात जेवढ्या दंगली झाल्या नाहीत तेवढ्या जलील यांच्या काळात झाल्या. किराडपुरा येथील दंगलीत मरण पावलेल्या समीर खान आणि त्याच्या कुटुंबाला अद्याप न्याय मिळाला नाही. ही दंगल घडली नव्हती, तर खासदारांनी घडवून आणली होती, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

दौलताबाद किल्ल्यासमोरील व्यावसायिकांना एका अधिकाऱ्याने व्यवसाय करण्यापासून पासून वंचित केले आहे. अनेक व्यावसायिकांची दुकानं पाडण्यात आली. त्यामुळे तरुण व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. जर आमचे उमेदवार निवडून आले तर त्या अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देवू, असा इशाराच त्यांनी दिला.

आंबेडकर यांची सभा सुरु असताना चार ते पाच वेळा विद्युत पुरवठा खंडित झाला. यावरूनही सुजात यांनी सत्ताधिकाऱ्यांवर निशाणा साधला. सुजात म्हणाले, आमचे विरोधक घाबरले आहेत. समोरून काही करता येत नाही म्हणून विद्यूत पुरवठा वारंवार बंद करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात डिजिटल पुराव्यांची प्रत सादर

CM Devendra Fadnavis : राज्याच्या विकासाला नवे बळ; ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये १०,८३१ कोटींचे करार

Indian Railways Fare Cut : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! दहा गाड्यांचे तिकीट दर स्वस्त होणार

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

SCROLL FOR NEXT