file photo 
मराठवाडा

Video - उरुसावर ‘सीसीटीव्हीं’ची नजर

सकाळ वृत्तसेवा

परभणी : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेल्या येथील सय्यद शाह तुराबुल हक साहेब यांचा उरूस राज्यात प्रसिद्ध आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या या उरुसादरम्यान, अनुचित घटनांवर ‘नजर’ ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणेने ३२ ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावले आहेत. यामुळे खिसेकापूंसह टवाळखोरांवर निश्चितच काही प्रमाणात आळा बसण्यास मदत होत आहे.

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक समजल्या जाणाऱ्या सय्यद शाह तुराबुल हक्क साहेब यांच्या उरुसास शुक्रवारपासून (ता. ३१) सुरवात झाली आहे. मराठवाड्यासह राज्यातील भाविकांसह १५ दिवस चालणाऱ्या या उरुसात राज्यासह परराज्यांतून विक्रेते मोठ्या संख्येने दाखल होत असतात. विविध खेळण्यांसह पदार्थांचे स्टॉल्स येथे लागतात. त्याचबरोबर उंच आकाशपाळणे, अबालवृद्धांसह बच्चेकंपनीसाठी विविध खेळ दाखल होत असल्याने या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची, नागरिकांची गर्दी मोठी असते.

२४ तास पोलिस अधिकारी

अशा या भव्यदिव्य उरुसावर जिल्हा पोलिस यंत्रणेचा चोख बंदोबस्त असतो. २४ तास पोलिस अधिकारी, कर्मचारी डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत असतात.
पोलिसांच्या या बंदोबस्ताबरोबरच या वर्षी ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचीही ‘नजर’ राहणार आहे. यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरीक्त पोलिस अधीक्षक आर. रागसुधा, सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी पुढाकार घेत संबंधित यंत्रणांशी चर्चा करीत ‘स्पॉट’ निश्चित करून तातडीने पावले उचलली.


खिसेकापूंसह टवाळखोरंना आळा

या ‘सीसीटीव्ही’मुळे गर्दीचा गैरफायदा घेत काही जण महिला, मुलींची छेड काढण्यासह छोट्या - मोठ्या चोऱ्या करणे, खिसे कापण्याचे प्रकारही करत असतात. पोलिस अधिकारी, कर्मचारी उरुसात सतत फिरत असतातच. मात्र, अनेक वेळा गर्दी असल्याने दुकाने, स्टॉल्समुळे पलीकडील दिसण्यास अडथळे येतात. या अडथळ्यांवर या वर्षी ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांमुळे निश्चितच पोलिस यंत्रणेने मात केली. ‘सीसीटीव्ही’मुळे खिसेकापूंसह टवाळखोरांवर निश्चितच काही प्रमाणात आळा बसला असल्याचेही मागील चार दिवसांत दिसून आले आहे.


आकाशपाळणे, जादूच्या खेळांनी वेधले लक्ष
यात्रेचे आकर्षण असलेले उंचच उंच आकाशपाळणे, ब्रेक डांस, मौत का कुंवा, पन्नालाल, जादूच्या खेळांसह खेळण्यांची छोटी-मोठी अनेक दुकानांचे स्टॉल आहेत. विशेष म्हणजे या वर्षी मागील वर्षीपेक्षा दुपटीने दुकानांची उभारणी करण्यात आली आहे. आवाढव्य अशा या उरुसावर लक्ष राहावे, अप्रिय घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. रागसुधा, सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी वक्फ बोर्डासह महापालिका व जिल्हा प्रशासनाशी चर्चा करत ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांसाठी यशस्वी प्रयत्न केले.

प्रतिबांधात्मक कारवाई
दर्ग्याच्या मुख्य भागात चार सीसीटीव्ही कॅमेर आहेत. तेथे आणखी दोन कॅमेरे लावण्यात आले आहेत. शिवाय, संपूर्ण उरुसावर लक्ष ठेवण्यासाठी २८ कॅमेरे बसविण्यात आले. इतर चार कॅमेर गर्दीच्या ठिकाणी लावले जात आहेत. संपूर्ण परिसर कव्हर केला असून यामुळे निश्चितच अप्रिय घटनांना आळा बसणार आहे. ‘सीसीटीव्ही’मुळे मागील चार दिवसांत महिलांच्या छेडछाडीच्या काही घटना तातडीने दिसून आल्या. संबंधितांवर तातडीने प्रतिबांधात्मक कारवाई केली.
- प्रमोद पाटील,
पोलिस निरीक्षक, कोतवाली पोलिस ठाणे, परभणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

SCROLL FOR NEXT