फोटो 
मराठवाडा

वेदनेच्या गावात मायेचा ‘वर्षा’व... 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : घरातील कर्ता माणूस गेल्यानंतर त्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो. वेदनांचा कहर होतो. त्या घरात, त्या कुटुंबात सुख आणि आनंद नावाची गोष्ट शोधून सापडत नाही. अशा घरात वयात येणारी पोर जीवाला चटका लावणारी असते. तिचा विवाह करावाच लागतो परंतु त्यासाठी पैसाअडका कुठून जमा करणार ही मोठी अडचण असते. अशा परिस्थितीत लोकसेवा करण्याचा वसा घेतलेल्या वर्षाताई भोसीकर यांचा मदतीचा हात पुढे येतो. वेदनेच्या गावात सुखाची झुळूक आली.

सततच्या कर्जाला कंटाळून नैराश्यपोटी नागनाथ वाघमारे यांनी जुलै २०१९ मध्ये आत्महत्या केली. नागनाथच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दुः खाचा डोंगर कोसळला. मुलं अनाथ झाली. सर्व परिसरात हळहळ व्यक्त झाली. त्यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना अन्नधान्य व रोख मदत करून सांत्वन केले होते. व मुलीच्या विवाहासाठी व मुलाच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

खऱ्या अर्थाने कन्यादान 

त्यांच्या मुलीचा विवाह जमला असल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वर्षा भोसीकर यांनी आत्महत्याग्रस्त वाघमारे कुटुंबीयाची भेट घेऊन त्यांना संसारोपयोगी भांडी व लग्नासाठी आर्थिक मदत करून मुलीला तिच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. मुलीच्या आईला धीर देत आम्ही सदैव तुमच्या कुटुंबीयांसोबत आहोत व तुमच्या मुलाला यापुढे उच्च शिक्षणासाठी भविष्यामध्ये मदत करण्याचे आश्वासन दिले. या वेळी कृष्णाभाऊ भोसीकर, तंटामुक्ती अध्यक्ष माधव वाघमारे, ग्राम पंचायत सदस्य अरविंद वाघमारे, यशवंत भोसीकर, तानाजी मारकवाड, शेख याकुब, तिरुपती राठोड व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील आत्महत्या काही थांबेनात

नांदेड जिल्ह्यात सतत नापिकी होत असल्याने शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. घरगाडा चालिण्यासाठी शेतकरी खासगी किंवा बॅंकेचे कर्ज काढून आपल्या मुलांना सांभाळतो. एवढेच नाही तर परत परत हिम्मत न हरता तो काळ्या आईची कुस दरवर्षी चांगला हंगाम येईल या आसेवर पेरणी करतो. परंतु लहरी निसर्गाच्या सपाट्यात शेतकरी अडकत जात आहे. सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणामुळे दरमहा दहा ते पाच ते सात आत्महत्या अजूनही होत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे यासाठी सरकारने ठोस निर्णय घेणे अपेक्षीत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganpati Visarjan: ३१ तासांच्या भव्य विसर्जन मिरवणुकीचा समारोप, ढोल-ताशांच्या गजरात पुणेकर मंत्रमुग्ध

Ganpati Visarjan 2025 Live Updates : एरंडोल येथे गणेश विसर्जन शांततेत पार पडले

Latest Maharashtra News Live Updates: लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं ! साडेदहा-अकरा वाजेपर्यंत लांबण्याची शक्यता

Valley of Flowers Maharashtra: महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पाहायचंय? मग भेट द्या साताऱ्याजवळील या निसर्गरम्य ठिकाणी!

Chapati Reheating : चपाती पुन्हा गरम करून खावू नये..पण का? डॉक्टर काय सांगतात पाहा..

SCROLL FOR NEXT