file photo 
मराठवाडा

कमी किंमतीत चैनीच्या वस्तु, अनेकांना २० लाखांचा गंडा

प्रल्हाद कांबळे

नांदेड : स्वस्तात मोबाईल, टीव्ही व अन्य इलेक्ट्रॉनीक्स वस्तु देतो म्हणून एका टोळीने शहरातील अनेकांना जवळपास २० लाखाचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात एका बिहारीसह त्याच्या इतर साथिदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, नांदेडच्या विष्णुनगर भागात राहणारा शुभम भमेश पामलु हा इलेक्ट्रॉनीक्स वस्तु विकत असे. यातूनच बिहार येथील परंतु कामानिमित्त नांदेडला आलेला देशपाल श्रीवास्तव याच्या सोबत त्याची मैत्री झाली. या दोघांनी काही दिवस इलेक्ट्रॉनीक वस्तु विक्री केल्या. दोघांचा विश्‍वास एकमेकावर बसल्याने त्यांनी टीबीबी नावाची एक एजन्सी सुरू केली. या एजन्सीच्या मार्फत ग्राहकांकडून कमी पैसे घेऊन किंमती वस्तु देण्याचा सपाटा सुरू केला. १५ हजाराची वस्तु ते बारा हजारात देत असल्याने अनेकांना त्याचा लाभही झाला. ते मोबाईल, टीव्ही, वाशींग मशीनसह आदी इलेक्ट्रॉनीक्स वस्तु आॅन लाईन खरेदी करून आम्ही कमी दरात विकत असल्याचे त्यांनी ग्राहकांना सांगितले. खरे तर ते येथूनच वस्तु खरेदी करत असल्याचे समोर आले. 

वस्तु स्वस्तात देतो असे आमिष 

वेबसाईट व आॅनलाईनच्या माध्यमातून वरील वस्तु स्वस्तात देतो असे आमिष दाखविले. यात शहरातील अनेक मोबाईल विक्री करणारे दुकानदारही अडकले. विशेष म्हणजे देशपाल श्रीवास्तव व त्याचा मित्र शुभम पामलु यांच्यातील मैत्री तुटली. श्रीवास्तव हा बिहारला निघून गेला. हा प्रकार ता. एक आॅगस्ट २०१९ ते ता. २४ फेब्रुवारी २०२० या काळात घडला. जवळपास १०० ते १५० ग्राहकांकडून त्यांनी जवळपास २० लाख रुपये घेतले. मात्र त्यांना कुठलीच वस्तु पुरविली नाही. 

बिहारी श्रीवास्तवसह त्याच्या साथिदारावर गुन्हा

शहरातील काही दुकानदारांकडून मोबाईल खरेदी केले त्यांनाही गंडा घातला. श्रीवास्तव हा संपर्काच्या बाहेर गेल्याने पैसे भरलेल्यांनी एकत्र येऊन फसगत झाल्याची तक्रार वजिराबाद पोलिस ठाण्यात दिली. यावरून पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अखेर या प्रकरणात शुभम भुमेश पामलु याची तक्रार दाखल करून घेतली. तक्रारीवरुन पोलिसांनी देशपाल श्रीवास्तव, शिवशंकर प्रसाद, शुभम सारगल, सुशांत घोष व इतराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडे करत आहेत.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT