सेलू (जि. परभणी) - लोअर दूधना धरणाची चौदा दरवाजातून होत असलेल्या विसर्गामुळे मोरेगावच्या पुलावरून असे पाणी वाहत आहे. 
मराठवाडा

लोअर दूधना धरणाची चौदा दरवाजे उघडले; वाहतूक ठप्प, शेतीचे नुकसान

विलास शिंदे

सेलू (जि.परभणी) : तालुक्यातील लोअर दुधना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी (ता.२०) दुपारपासून जोरदार झाला. धरण शंभर टक्के भरल्याने सोमवारी सायंकाळी साडेसहा ते मंगळवारी (ता.२१ ) रोजी पहाटे दीड वाजेपर्यंत बारा दरवाजे, तर सकाळी आठच्या सुमारास विसर्ग वाढविण्यात आला. एकूण चौदा दरवाजे उघडून ३०,३२४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात (Parbhani) आला आहे. तालुक्यातील (Lower Dhudana Dam) लोअर दूधना प्रकल्प धरणाच्या चौदा दरवाजातून ३०,३२४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू असल्याने सेलू-देवगाव (फाटा ) मार्गे औरंगाबाद, जिंतूरकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टी व मोठ्या विसर्गाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी तालुकाअंतर्गत मुख्य रस्ते व जोडरस्त्यावरील नदी, नाल्यांना, ओढ्यांना पूर (Selu) आला आहे. येथील कमी उंचीच्या पुलांवर पाणी वाहत असल्याने सुमारे ५५ हून अधिक गावांचे दळणवळण ठप्प झाले आहे.

नदीकाठच्या शेत जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी घुसले असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत धरण परिसरात गेल्या २४ तासांत ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ५,४६४ क्युसेक्स दराने धरणात पाणी आले असून सकाळी साडेसहा वाजेपर्यंत १३.३६७ दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जालना जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री आठपासून दहा वाजेपर्यंत लाभक्षेत्रातही ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पहाटे चार वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता. धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. धरण शंभर टक्के भरल्याने द्वार क्रमांक एक ते सात व चौदा ते ०.६० मीटरने उघडण्यात आली आहेत. त्या द्वारे ३०,३२४ क्युसेक्स ( प्रति सेकंद ८ लाख ५८ हजार ४३२ लिटर ) पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT