Mahabhumi Sakal
मराठवाडा

Mahabhumi : महाभूमी पोर्टल तीन दिवसांपासून बंद; शेतजमिनीशी संबंधित कामे, खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प

महाभूमीच्या डिजिटल सातबारा पोर्टलचे मुख्य नियंत्रण पुणे येथे असले तरीही त्या अनुषंगाने या साईटवर कोणताही हेल्प डेस्क क्रमांक किंवा मेल आयडी दिलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

माणिकनगर : महसूल विभागाच्या वतीने चालवली जाणारे महाभूमी पोर्टल तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेती आणि जमिनीशी सबंधित सर्व शासकीय, निमशासकीय कामे, खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत.

महाभूमी पोर्टलवरून डिजीटल सातबारा, एकूण जमिनीचा दाखला (८-अ), फेरफार, मालमत्ता कार्ड, ई-रेकॉर्ड आदी डिजिटल सहीचे दाखले काढण्याच्या ऑनलाइन सुविधा शासनाने दिलेल्या आहेत. त्यामुळे तलाठी, भूमी अभिलेख, तहसील कार्यालयांवर असलेला भार कमी झाला होता.

मात्र, रविवारी दुपारपासून महाभूमीचे पोर्टल लॉगिन होत नसल्यामुळे महा ई-केंद्रचालक, शेतकरी, विविध कार्यकारी सोसायटी, बँक खातेदार, खरेदी-विक्री करणारे आदी सर्वच जण त्रस्त झाले आहेत. यावर आधारित शासनाच्या विविध विभागांचा आणि बँकांचा लाखो रुपयांचा महसूलदेखील बुडत आहे.

तक्रार करावी तरी कोणाकडे ?

महाभूमीच्या डिजिटल सातबारा पोर्टलचे मुख्य नियंत्रण पुणे येथे असले तरीही त्या अनुषंगाने या साईटवर कोणताही हेल्प डेस्क क्रमांक किंवा मेल आयडी दिलेला नाही. त्यामुळे हे पोर्टल कधी चालू होणार किंवा काय अडचण आहे, याबाबत कोणालाही उत्तरे देता येत नाहीत, अशी माहिती महा ई-सेवा केंद्र चालकांनी दिली.

दोन दिवसांपासून मारतोय चकरा

मला सोसायटीकडे वाढीव कर्जासाठी अर्ज करायचा आहे. त्यादृष्टीने आवश्यक सातबारा आणि एकूण जमिनीचा दाखला काढण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या महा ई-सेवा केंद्रांवर चकरा मारून थकलो आहे, अशी माहिती त्रस्त शेतकरी रमेश कळम यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT