Parbhani Lok sabha result sakal
मराठवाडा

Parbhani Lok Sabha Result : संजय जाधवच परभणीचे ‘बॉस’! ; महादेव जानकर यांना परभणीकरांनी नाकारले

परभणी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार संजय जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवत आपणच परभणीचे बॉस हे सिद्ध केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार संजय जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवत आपणच परभणीचे बॉस हे सिद्ध केले आहे. दुसरीकडे मात्र महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना या मतदार संघात पराभव स्विकारावा लागला आहे. परभणी लोकसभा मतदार संघात यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय जाधव व राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यात अत्यंत तुल्यबळ लढत पहावयास मिळाली. या मतदार संघात मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद उभा करण्याचा प्रयत्न ही झाला.

महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी भाजपने सर्वप्रकारे ताकद उभी केली होती. भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी एकजुटीने जानकरांच्या प्रचारात उतरले होते. तर दुसरीकडे संजय जाधव यांच्यासाठी देखील महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांनी जीवाचे रान केले होते. अगदी सुरुवातीपासूनच संजय जाधव यांनी आपणच विजयी होणार हा आत्मविश्वास दाखविला होता. तो तंतोतंत खरा ठरला.

परभणी लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात ता. २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी २ हजार २९० मतदान केंद्रावर एकूण १३ लाख २१ हजार ८६८ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदार संघात एकूण २१ लाख २३ हजार ५६ मतदार संख्या आहे. एकूण ६२.२६ इतके टक्के मतदान झाले होते. अगदी पहिल्या फेरीपासूनच संजय जाधव हे आघाडीवर राहिले. पहिल्या फेरीतच संजय जाधव यांनी ३ हजार २४६ मताची आघाडी घेतली होती. दुसऱ्या फेरी अखेर त्यांना ८ हजार ६३४ मताची आघाडी मिळाली. त्यांची मतांची आघाडी त्यानंतरच्या एकाही फेरीत कमी झाली नाही. त्यांची ही आघाडी शेवटच्या फेरी पर्यंत तुटलीच नाही. शेवटच्या फेरी अखेर संजय जाधव यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार महादेव जानकर यांचा तब्बल १ लाख ४१ हजार मतांनी पराभव केला.

मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने

परभणी लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीची प्रक्रिय अत्यंत संथ गतीने सुरू झाली होती. सकाळी ८ वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरुच होती. पहिली फेरीचा निकाल जवळपास १० वाजता जाहीर करण्यात आला. त्यानंतर अत्यंत संथ गतीने निवडणुकीच्या फेऱ्यांची मोजणी होऊन फेरी निहाय निकाल जाहीर करत होते.

यंदाची निवडणुक ही कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांच्या हातात नव्हती. ती थेट मतदारांच्या हातात होती. माझे प्रतिस्पर्धी बाहेरचे होते.ती माझ्यासाठी जमेची बाजू ठरली. लोकांनी ठरवले त्यामुळेच मी एवढे मताधिक्य घेवू शकलो. लोकांना त्यांच्या सुख दुखात मी धावून जात होतो. त्याची परतफेड आज या मतदार संघातील लोकांनी केली असे मला वाटते.

- संजय जाधव, खासदार, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT