navratri festival sakal
मराठवाडा

Kollapur: कडेठाण येथील महालक्ष्मी देवी नवराञोत्सवाची तयारी पुर्ण...

Kollapur: श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असुन, समाज कंटकांवर राहणार सीसीटीव्हीची नजर पाचोड पोलीस ही ठेवणार तगडा बंदोबस्त

मुनाफ शेख

आडुळ ता. श्री क्षेत्र कोल्हापूर निवासिनी देवीचे उपपिठ म्हणुन ओळखल्या जाणारया कडेठाण (ता.पैठण) येथील श्री महालक्ष्मी देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असुन गेल्या महिनाभरापासुन मंदिर संस्थान चे पदाधिकारी व गावकरी या महोत्सावाची तयारी करीत होते. उद्या गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी पासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त मंदिराची रंगरंगोटी करुन मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली या मंदिरावर उभारण्यात येणारे ५१ फूट उंच शिखराचे काम ही प्रगतीपथावरआहे.

पैठण तालुक्यातील कडेठाण येथील श्री महालक्ष्मी देवीचे मंदिर हे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीचे महाराष्ट्रातील एकमेव उपपीट आहे. नवरात्र उत्साहात देवीच्या दर्शनासाठी येथे मराठवाड्याच्या कानाकोपरयातुन भाविक मोठ्या संख्येने येतात. यावर्षी दहा दिवसांमध्ये नवरात्र उत्सवाच्या काळात पाच लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असून मंदिर प्रशासनाच्या वतीने त्या पद्धतीने व्यवस्था केलीआहे.

भाविकांची संख्या मोठी असल्याने काही अप्रिय घटना घडु नये म्हणुन मंदिर प्रशासनाने विविध उपाययोजन केल्या आहे शिवाय सुरक्षेच्या कारणास्तव पाचोड पोलीस हि मोठा बंदोबस्त ठेवणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरिक्षक शरदचंद्र रोडगे यांनी दिली आहे. शिवाय मंदिर मध्ये व मंदिर परिसरात यावर्षी मंदिर संस्थांनी भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी ३२ सी.‌‌ सी. टीव्ही कॅमेरे बसवले आहे.

श्री क्षेत्र कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या मंदिरातून नवरात्र उत्सवासाठी कोल्हापूरयेथून पेटती ज्योत घेऊन येण्यासाठी कडेठाण येथील २० नवयुवक तरुण २६ सप्टेंबर रोजी श्री महालक्ष्मी संस्थान कडेठाण येथून आज रवाना झाले होते ते कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या मंदिरातून ज्योत पेटवून पायी चालत येत असुन हे सर्वजण  ज्योत घेऊन घटस्थापनेच्या दिवशी सकाळी कडेठाण येथील महालक्ष्मीच्या मंदिरात येणार आहे.

गेल्या वर्षी नवरात्र उत्सवाच्या काळात मंदिर संस्थांना योग्य नियोजन भाविक भक्तांची सुरक्षा व शांतता व पोलीस प्रशासनाला केलेली मदत याची दखल घेत छञपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते मंदिर संस्थांनला प्रशस्तीपत्र देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

SCROLL FOR NEXT