maharashtra politics MLA Dr Rahul Patil join eknath shinde its rumor mla rahul patil in mumbai
maharashtra politics MLA Dr Rahul Patil join eknath shinde its rumor mla rahul patil in mumbai  sakal
मराठवाडा

मी नॉट रिचेबल ही केवळ अफवाच; आमदार डॉ. राहूल पाटील

सकाळ वृत्तसेवा

परभणी : मी कुठेही गेलेलो नाही. मी मुंबईतच आहे. मला कुठे जाण्याची गरज नाही असे स्पष्टीकरण परभणीचे आमदार डॉ. राहूल पाटील यांनी सोमवारी (ता.२७) सकाळशी बोलतांना दिले. राज्यात सध्या सुरु असलेला सत्तासंघर्ष आता शिगेला पोहचला आहे. शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून जवळपास ४० च्यावर आमदार सध्या एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले आहेत. हे सर्व आमदार सध्या गुहाआटी येथे वास्तव्यास आहेत. त्यातच सोमवारी (ता.२७) सायंकाळी परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहूल पाटील हे सुरत मार्गे गुहाआटीला गेल्याची अफवा पसरली होती.

या संदर्भात थेट आमदार डॉ. राहूल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मी कुठेही गेलेलो नाही. मी मुंबईतच आहे. मला कुठे जाण्याची गरज नाही. मी कालच युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला हजर होतो. त्या बैठकीस पर्यटन मंत्री अदित्य ठाकरे हे देखील हजर होते. माझ्या बद्दल ज्यांनी कोणी अफवा पसरवली असेल. त्यांना माझी विनंती आहे की, एखाद्या लोकप्रतिनिधी विषयी असे चुकीचे संदेश देवून संभ्रम निर्माण करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT