हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने कोरोनाच्या प्रादुर्भाव ओसरल्यानंतर आँफलाईन बारावीच्या परीक्षा घेतल्या बुधवारी ता. आठ बारावीचा निकाल जाहीर केला आहे. हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९३. ५३ टक्के लागला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आँनलाईन स़ेटवर गर्दी केली होती. कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर यावर्षी दहावी व बारावीच्या परीक्षा आँफलाईन घेण्यात आल्या. या वर्षी १६ हजार ३६१ विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रे भरली होती . त्यापैकी १६ हजार १६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. हिंगोली जिल्ह्याचा निकाल ९५.५३ टक्के लागला आहे.
हिंगोली तालुक्यात २८८५ विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रे भरली होती. त्या पैकी २८३८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली यात २५८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तालुक्याचा निकाल ९१ १९ टक्के लागला आहे.यात ५२३ विद्यार्थी प्रावीण्यसह उत्तीर्ण झाले. प्रथम ग्रेडमध्ये १११९ तर द्वितीय ग्रेड मध्ये ७३० उत्तीर्ण श्रेणीत १०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कळमनुरी तालुक्यात २६५० विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रे भरली होती. त्या पैकी २५८६ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली यात २४५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तालुक्याचा निकाल ९४ ७७ टक्के लागला आहे.यात २३२ विद्यार्थी प्रावीण्यसह उत्तीर्ण झाले. प्रथम ग्रेडमध्ये १२०४ तर द्वितीय ग्रेड मध्ये ९६६ उत्तीर्ण श्रेणीत ४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
वसमत तालुक्यात ४११८ विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रे भरली होती. त्या पैकी ४०८७ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली यात ३८५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले तालुक्याचा निकाल ९४.२०टक्के लागला आहे.यात ६५३ विद्यार्थी प्रावीण्यसह उत्तीर्ण झाले. प्रथम ग्रेडमध्ये १९४१ तर द्वितीय ग्रेड मध्ये १२११ उत्तीर्ण श्रेणीत ४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यात २०३१ विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रे भरली होती. त्या पैकी १९८१ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली यात १८७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तालुक्याचा निकाल ९४.४६ टक्के लागला आहे.यात ४१४ विद्यार्थी प्रावीण्यसह उत्तीर्ण झाले. प्रथम ग्रेडमध्ये १०९० तर द्वितीय ग्रेड मध्ये ३३१ उत्तीर्ण श्रेणीत १४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
औंढा तालुक्यात १६७७ विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रे भरली होती. त्या पैकी १६६५ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली यात १४४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तालुक्याचा निकाल ९२ ८५ टक्के लागला आहे.यात २४३ विद्यार्थी प्रावीण्यसह उत्तीर्ण झाले. प्रथम ग्रेडमध्ये ६४७ तर द्वितीय ग्रेड मध्ये ६०४ उत्तीर्ण श्रेणीत ५२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात विशेष प्रावीण्यासह दोन हजार १०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत सहा हजार ६७ , द्वितीय श्रेणी तीन हजार ८५२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत २६१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.