उदयसिंद राजपूत, हर्षवर्धन जाधव 
मराठवाडा

कन्नड (जि. औरंगाबाद) : हर्षवर्धन जाधव पिछाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

कन्नड (जि. औरंगाबाद) - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उदयसिंग राजपूत 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याशी त्यांची थेट लढत होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांवर खालच्या पातळीवर जाऊन जाधव यांनी प्रचारादरम्यान टीका केली होती, त्याचा मोठा फटका त्यांना बसताना दिसतो आहे. 

पाचव्या फेरी अखेर शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांना 20,057 तर हर्षवर्धन जाधव यांना 9,794 मते मिळाली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संतोष कोल्हे 8,202 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करत हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेच्या विरोधात निवडणूक लढवली होती. 2 लाख 83 हजार मते मिळवत त्यांनी मोठ्या प्रमाणात मतविभाजन केले होते. त्याचा थेट परिणाम शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यावर झाला होता. परिणामी, वीस वर्षानंतर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा पराभव होऊन एमआयएमचे इम्तियाज जलील निवडूण आले होते.

जाधव हेच शिवसेनेच्या पराभवाला कारणीभूत असल्यामुळे जाधव यांना पराभूत करण्याचा शिवसैनिकांनी निर्धार केला होता. अशातच हर्षवर्धन जाधव यांनी केलेले शिवसेना विरोधी विधानाचा फटाक त्यांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसतो आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Van Accident : पुण्यात धक्कादायक अपघात! पोलीस व्हॅनने उडवल्या ७ गाड्या; CCTV व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : नागपुरात E20 विरोधात गडकरींच्या घरासमोर युवक काॅंग्रेस आक्रमक

Chandrakant Patil: मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये दैवी गुण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून कौतुक

Pune News: पुणेकरांनो, अजून किती वाट पाहणार? PMRDA चे ३,९०६ कोटींचे प्रकल्प अजूनही रखडले, घोषणा फक्त कागदावरच..

Engineering CAP Result: इंजिनिअरिंग प्रवेशाची पहिली यादी जाहीर; १६ हजार विद्यार्थ्यांना पहिल्याच पसंतीचे कॉलेज! जाणून घ्या महत्त्वाच्या पायऱ्या

SCROLL FOR NEXT