Namita Mundada
Namita Mundada 
मराठवाडा

केज : राष्ट्रवादी काँग्रेसला झटका | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

केज (जि. बीड) : पाचव्यात फेरीत भाजपच्या नमिता मुंदडा यांना २२,७०४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे  पृथ्वीराज साठे  यांनी १२,९११ मते घेतली. 
भाजपच्या मुंदडा यांना पाचव्या फेरी अखेरीस ९,७९३ मतांची आघाडीवर आहेत.

दोन वेळचा अपवाद वगळता अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदार संघातून दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा सलग पाच वेळा विजयी झाल्या. त्या दोन वेळा भाजप तर तीन वेळा राष्ट्रवादीकडून विजयी झाल्या. दिवंगत मुंदडांच्या सून नमिता मुंदडा राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये जाऊन उमेदवार झाल्या. त्यांच्या विरोधात
राष्ट्रवादीकडून पृथवीराज साठे आहेत. केज मतदारसंघातून 12 उमेदवार आहेत.

या मतदारसंघ मागील बऱ्याच काळापासून पुरोगामी विचारांचा प्रभाव असणारा होता. मात्र, 1990 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विमल मुंदडा यांनी भागूजी सातपुते यांचा पराभव करून पहिल्यांदाच विजय मिळवला. त्यानंतर त्या एकवेळ भाजपकडून तर तीनवेळा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून चढत्या क्रमाने मताधिक्‍य मिळवून विजयी झाल्या.

आघाडी सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. आपल्या कार्यकाळात विकासाची कामे करीत त्यांनी 'ओन्ली विमल' अशी आपली मतदारसंघात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे तत्कालीन समर्थक पृथ्वीराज साठे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांनी
या निवडणुकीत भाजपाच्या संगीता ठोंबरे यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी विमल मुंदडा यांच्या स्नुषा यांचा मोदी लाटेत बेचाळीस हजार मतांनी पराभव केला. यावेळी मोदी लाटेतही नमिता मुंदडा यांनी बासष्ट हजारांच्या वर मतदान घेतले होते. कार्यकाळात पक्षात झालेल्या अंतर्गत मतभेदाला कंटाळून
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर होऊनही मुंदडा कुटुंबीयांनी ती झुगारून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करीत विधानसभेची उमेदवारी मिळवली.

या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पृथ्वीराज साठे यांच्याशी सामना करावा लागणार आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह एकूण बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. यात मुंदडा, साठे, स्वामी यांचा समावेश आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT