संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

नांदेड दक्षिण : वातारवरण बदलले | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

नांदेड दक्षिण - मतदारसंघाची लढत राज्यात चर्चील्या जाणार असून या मतदार संघात राज्यातील सर्वाधीक ३८ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. प्रमुख लढतीत हिंगोली लोकसभेचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील निवडणुक रिंगणात आहेत.

गेल्यावेळी हेमंत पाटील हेच या मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार झाले होते. यंदा राजश्री पाटील यांची लढत कॉँग्रेसच्या मोहन हंबर्डे यांच्याशी असेल. अपक्ष व गेल्यावेळचे भाजपचे उमेदवार दिलीप कंदकुर्ते हेही रिंगणात असून त्यांनी शिवसेनेविरूध्द बंडखोरी केली आहे. इथे वंचित आघाडीने फारूक अहेमद व एमआयएमने महापालिकेचे नगरसेवक साबेर चाऊस यांना उमेदवारी देऊन मुस्लिम मते आपल्या पारड्यात पाडण्याचा प्रयत्न केला आहे. कॉँग्रेसने या मतदारसंघात आधी अब्दुल सत्तार यांच्या नावाचा अनेक दिवस जप केला होता. मात्र इच्छुक मुस्लिम उमेदवारांना टाळून नवेळी मोहन हंबर्डे यांना उमेदवारी दिली आहे.

मोहन हंबर्डे हे पंचायत समितीचे सभापती म्हणून तालुक्यात परिचीत आहेत. या मतदारसंघात भाजपने बंडखोरी केली तसेच व भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील उघडपणे दिलीप कंदकुर्ते यांना साथ देत असल्याने शिवसेनेची झोप उडाली आहे. तसेच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनाही पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आहे. शेवटच्या टप्यात शिवसेनेला झटका देण्यासाठी त्यांनी दिलीप कंदकुर्ते यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

तसेच भारतीय जनता पक्षाचे आमदार राम पाटील रातोळीकर व चैतन्यबापू देशमुख यांनी शिवसेना उमेदवार राजश्री पाटील यांचा प्रचार केला. तसेच भाजपचे माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनीही राजश्री पाटील यांची बाजू लढविली. ..

  • राजश्री पाटील (शिवसेना) : ३७६२
  • मोहन हंबर्डे (कॉँग्रेस) : ३६१३
  • साबेर चाऊस (एमआयएम) : ४०८८
  • फारूक अहेमद (वंचित आघाडी) : २८२४
  • दिलीप कंदकुर्ते (भाजप बंडखोर अपक्ष) : ४०४६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीला तिसरा धक्का! आर अश्विनला मिळाली सामन्यातील दुसरी विकेट

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT