साई जन्मसंस्थानमध्ये महाआरती 
मराठवाडा

Video : साई जन्मसंस्थानमध्ये महाआरती

धनंजय देशपांडे

पाथरी (जि.परभणी) : पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान असून त्याचा हक्क आम्ही सोडणार नाहीत. तिर्थक्षेत्र विकास ऐवजी साईजन्मभुमी म्हणूनच निधी द्यावा, अशी भूमिका घेत मंगळवारी (ता.२१) परभणी जिल्ह्यातील साईभक्तांनी पाथरीच्या साई मंदिरात महाआरती करून शासन दरबारी आपले मत मांडण्यासाठी जोर लावला.

पाथरी येथील साई जन्मभुमी संस्थानला राज्यशासनाने १०० कोटी रुपये विकास निधी देऊ केला आहे. परंतू निधीची घोषणा केल्यानंतर साई संस्थान शिर्डी व शिर्डीतील नागरीकांनी त्यास विरोध करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पेच निर्माण होऊन वाद सुरु झाला आहे. यावर तोडगा काढत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा निधी पाथरीला तिर्थक्षेत्र विकासमधून दिला जाईल, असे सोमवारी (ता.२०) घोषित केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर वादावर पडदा पडल्याचे म्हटले जात असले तरी, परभणीकरांना मात्र हे मान्य नाही. पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थान असून त्याच्या अनेक नोंदी असल्याचे परभणीकरांनी व जन्मभुमी संस्थानच्यावतीने सांगितले आहे. पाथरी हेच जन्मभुमी असून त्याचे अस्थित्व कुणी नाकारू नये यासाठी साई जन्मसंस्थान पाथरी (जि.परभणी) च्यावतीने मंगळवारी (ता.२१) महाआरती करण्यात आली. या महाआरतीच्या माध्यमातून परभणीकरांनी हीच साईबाबांची जन्मभूमी असल्याचे परत एकदा म्हणणे मांडले आहे. या महाआरतीस परभणीचे खासदार संजय जाधव, परभणीचे आमदार डॉ.राहूल पाटील, पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर, पाथरी विकास समितीचे अध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी, माजी आमदार मोहन फड, राजेश विटेकर, गंगाप्रसाद आनेराव, डॉ. विवेक नावंदर, अनिल नखाते आदीसह हजारो भाविक उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्व नेत्यांनी साईबाबांचे जन्मस्थळ हे पाथरी असून त्याचा हक्क आम्ही सोडणार नाहीत असे परत एकदा स्पष्ट केले आहे.

पाथरी शहर गजबजले
जन्मभूमीच्या वादानंतर पाथरी शहर प्रकाशात आले आहे. साई जन्मभुमी म्हणून दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची संख्या अचानक वाढली आहे. त्यामुळे पाथरी शहर गजबजले आहे. महाआरतीच्या कार्यक्रमास हजारो साईभक्त पाथरी शहरात आले होते. मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pappu Yadav: पत्रकार परिषदेतच मोठी घटना! खासदार पप्पू यादवांवर चाकुहल्ला; घटनेनं खळबळ, नेमकं काय घडलं?

IND vs SL : टीम इंडियासाठी श्रीलंका दौऱ्यातील प्लॅन ऐनवेळी बदलला! ४ दिवसांचा सामना ३ दिवसांतच संपणार

Road Protest: कनेरसर–पूर–पाबळ रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन; अपघातानंतर तातडीच्या दुरुस्तीची एकमुखी मागणी

Flipkart वरून फूड डिलिव्हरी कधी सुरु होणार? Zomato-Swiggy ला टक्कर देण्यासाठी कंपनीची खास रणनीती

Goa Foreign Liquor: डिकसळ येथे गोव्यातील प्रतिबंधित विदेशी मद्याचा 7.89 लाखांचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT