Hingoli  sakal
मराठवाडा

Hingoli News : जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजार ४३६ रुग्णांना लाभ ; महात्मा फुले जनआरोग्य योजना: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलासा

आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने शासनाच्या वतीने महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येते

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने शासनाच्या वतीने महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ७१ हजार ४३६ रुग्णांनी लाभ घेतला असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने नोव्हेंबर २०१३ पासून महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना राबवण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना आवश्यक ते उपचार मोफत मिळावेत, हा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार करण्यात येतात. जिल्ह्यातील तीन शासकीय व सहा खासगी रुग्णालयांत या योजनेंतर्गत उपचार घेण्याची सुविधा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका, आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र आवश्यक आहे. शिधापत्रिका व आधार कार्डावरील नाव सारखे असणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात या योजने अंतर्गत मागील वर्षभरात जवळपास ७१ हजार ४३६ रुग्णांनी मोफत उपचार घेतले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, याचिका फेटाळली, काय दिलं कारण?

NEET (UG) 2026: नीट (यूजी) २०२६ अर्जातील दुरुस्तीची संधी; १४ मार्चपर्यंत तपशील बदलता येणार

Pune News: युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत टोमॅटो, कांद्याचे भाव वाढले; आयात तात्पुरती थांबली, टोमॅटो अडीचशे तर कांदा पावणे दोनशे रुपये किलाे!

Thane News: ठाणेकरांसाठी मोठा दिलासा! प्रॉपर्टी टॅक्सच्या दंडावर तब्बल 90% सूट जाहीर; अंतिम मुदत किती? जाणून घ्या...

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

SCROLL FOR NEXT