4mahavitaran_57
4mahavitaran_57 
मराठवाडा

महावितरणचे अभियंता निलंबित, कामात कुचराई केल्याचा ठपका

सकाळ वृत्तसेवा

परळी वैजनाथ (जि.बीड) : महावितरण कंपनीचे सहायक अभियंता मोहम्मद जिलानी यांना कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे. शहरातील महावितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात कार्यरत असलेले सहायक अभियंता मोहम्मद जिलानी यांनी १३ नोहेंबर रोजी  दिवाळीच्या पहिल्या दिवशी ७.३० ते ११.३० पर्यंत ३३ के.व्ही. केंद्रातील मुख्य लाइनची तार तुडवल्याने वीज पुरवठा बंद पडला होता.

त्या लाईनची आपण वेळेवर दुरुस्ती केली नाही. त्यामुळे वीजपुरवठा अनेक काळ बंद राहिल्याने शहरातील ग्राहकांचा महावितरण कंपनीवर रोष व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे आधिपत्याखाली कर्मचारी कधीही ११ के.व्ही लाइनवर लाईन ट्रीप करतात. त्यावर नियंत्रण नाही. वीज ग्राहकांना व्यवस्थित न बोलणे, तक्रारीचे वेळेवर निवारण न करणे, मोठ्या प्रमाणावर थकबाकी असताना वसुली न करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे. अधीक्षक अभियंता रवींद्र कोलप यांनी ही निलंबन कारवाई केली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेच्या भीतीने काँग्रेसने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणं टाळलं - अमित शाह

SCROLL FOR NEXT