सभागृहात यासारख्या कवितांचे फलक लावले होते. Sakal
मराठवाडा

ये सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे

कविताचित्रांनी सजलाय मुख्य सभामंडप : रसिकांचा मोठा प्रतिसाद

केतन ढवण

भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी (उदगीर) - ‘ये सनम ऑँखों को मेरी खूबसूरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे’ या दख्खणी कवितेसह ओवी, अभंग, चारोळी मुक्तछंद या अन् इतर छंद प्रकारातील कवितांनी ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मुख्य सभामंडप सजलाय. त्यामुळे प्रेक्षकांतून किंवा व्यासपीठावरून कुठेही मान वळवली तरी सुंदर कविता असलेले फलक अन् त्याला साजेशा चित्रांचा सभोताल नजरेच्या टापूत येत आहे. संमेलनाच्या मुख्य सभामंडपात उद्‍घाटन आणि इतर महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. त्यामुळे इतर व्यासपीठापेक्षा या ठिकाणी गर्दीही अधिक आहे. गर्दीमुळे या ठिकाणी उकाडाही अधिक जाणवत आहे. पण, या उकाड्यातही भिंतीवर असलेल्या या २६ कविता गारवा देत आहेत.

‘अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं माझं गाणं पोटातून येते व्हटी’

कवी बहिणाबाई चौधरी यांच्या देवीवर वृत्तातील या रचेनेसह अलीकडील अनेक नवोदित कवींच्या मुक्तछंदातील रचनांचाही यामध्ये समावेश आहे. सहजतेने रसिकांच्या दृष्टीस पडेल अशा या दालनाला ‘कविताचित्रे’ असे समर्पक नाव आयोजकांनी दिले आहे. या दालनाची संकल्पना ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांची आहे. कवितेला अनुसरून चित्रकार शिवाजी हांडे (लातूर) यांनी सुंदर अशी रेखाटने केली आहेत. कवितांची निवड श्री. दगडे, योगीराज माने, रमेश चिल्ले यांनी केली.

ही जाणवली उणीव

ही संकल्पना अत्यंत चांगली आहे. तिला रसिकांचा प्रतिसादही मिळत आहे. या कविताचित्र दालनासाठी उत्तम कवितांची निवड केली. पण, ज्यांच्या कविता आहेत त्यांची नावे या कवितेसोबत दिलेली नाहीत. तीही आयोजकांनी दिली असती तर सभागृहात टांगलेल्या या कवितांना ‘चार चॉँद’ नक्कीच लागले असते, अशी प्रतिक्रियाही काही रसिकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phaltan Politics:'फलटण पालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार'; राजे गट अन् शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांचा एकदिलाने लढवण्याचा निर्धार..

माेठी बातमी! 'फलटण तालुक्यातील दाेन केमिकल कंपन्यांना भीषण आग'; सव्वाआठ कोटींचे नुकसान, पळापळी अन् काय घडलं !

Latest Marathi News Live Update : मालेगावातील भीषण घटनेच्या निषेधार्थ पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा!

Kagal crime News: शेतजमिनीच्या वादातून वृद्धाला आणि एका महिलेला मारहाण, या दोन परस्‍परविरोधी तक्रार कागल पोलिस ठाण्यात दाखल

Satara fraud:'कार विकून अनेकांना गंडा घालणाऱ्यांना अटक'; बनावट कागदपत्रांद्वारे सांगली, कोल्हापूर, निपाणी आदी ठिकाणी व्यवहार

SCROLL FOR NEXT