Makar Sankranti 2023 Sesame price increased by Rs 50 parbhani sakal
मराठवाडा

Makar Sankranti 2023 : नात्यातील ‘गोडवा’ यंदाच्या वर्षी झाला महाग

तिळाचे भाव ५० रुपयांनी वधारले

सकाळ वृत्तसेवा

परभणी : आपल्या जवळच्या माणसांच्या नात्यातील गोडवा कायम राहावा, यासाठी सर्वचजण प्रयत्न करत असतात. नात्यातील गोडवा वृद्धिंगत करण्यासाठी मकर संक्रांत हा सण सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतो.

या दिवशी एकमेकांना तिळगूळ देवून नात्यातील गोडवा कायम ठेवण्याची विनंती केली जाते. परंतु, यंदा नात्यातील हा ‘गोडवा’ महाग झाला आहे. कारण आहे, तिळाच्या वाढत्या भावाचे. गतवर्षीपेक्षा यंदा तिळाचे भाव तब्बल ४० ते ५० रुपये किलो मागे वधारले आहेत.

भारतीय संस्कृतीत महिलांसाठी मकर संक्रांत अतिशय महत्त्वाचा सण मानला जातो. तीळ आणि गुळाला अधिक महत्त्व दिले जाते. प्रत्येक घरी एकमेकांना तिळगूळ घ्या.... गोड गोड बोला म्हणत तिळगूळ वाटण्याची परंपरा आहे.

यंदा सण साजरा करण्यासाठी तीळ बाजारात विक्रीसाठी आले आहेत. परंतु, नात्यात गोडवा वाढविणाऱ्या या सणाला महागाईची झळ लागली आहे. गेल्या वर्षी तीळ १५० ते १६० रुपये किलो दराने मिळत होते. यंदा तिळाच्या दरात तब्बल ४० ते ५० रुपये किलो मागे दरवाढ झाली आहे.

या वार्षिक भाववाढी सोबतच संक्रांत सण तोंडावर आलेला असताना तिळाच्या दरात आणखी १० ते १५ रुपयांची वाढ झाल्याचे किराणा विक्रेते सुधीर चिद्रवार यांनी सांगितले. त्यामुळे गतवर्षी १६० रुपये दराने मिळणारे तीळ यंदा मात्र २०० ते २१० रुपये किलो दराने विक्री होत आहे.

त्याच बरोबर तीळासोबत लागणारा गूळही ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्यात चिक्कीचा गूळ ६० ते ६५ रुपये किलो दराने विक्री होत आहे. तिळाचा हलवाही १२० रुपयांवरून १५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे.

भाव किलो रुपयात)

पदार्थ २०२२ २०२३

तीळ १६० , १९० ते २१०

गूळ ३०,३५ ते ४०

हलवा १२० ते १५०

तीळ व गुळाचे दर वाढलेले आहेत. कोरोना नंतर सर्वच वस्तू महागल्या आहेत. त्याच पद्धतीने हे ही वाढले असावे, असे म्हणत खरेदी केली आहे. किती ही दरवाढ झाली तरी सण साजरा करावाच लागणार आहे.

— स्वप्ना बिलोलीकर, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : पडळकरांचं हे वागणं योग्य नाही! शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना केला फोन, नेमकं काय म्हणाले?

Yasin Malik : दहशतवादी यासिन मलिकचा मोठा दावा! म्हणाला, 'हाफिज सईदला भेटल्यानंतर मनमोहन सिंग यांनी...'; वाजपेयी, सोनिया गांधींचंही घेतलं नाव

Nitish Kumar: बेरोजगार भत्ता आता पदवीधरांनाही लागू; मुख्यमंत्री नीतिशकुमार यांची घोषणा, योजनेची व्याप्ती वाढविली

Purandar Airport : तब्बल २७०० एकर जागेची संमतिपत्रे, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ; जिल्हाधिकाऱ्यांकडून भूसंपादनाचा ‘पुणे पॅटर्न’

Nagar-Pathardi Road Accident:'नगर-पाथर्डी रस्त्यावरील अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू'; कामानिमित्त जाताना काळाचा घाला; बाराबाभळी शिवारातील घटना

SCROLL FOR NEXT