man beated his wife till she dies 
मराठवाडा

पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

भाऊसाहेब चोपडे

आळंद (जि. औरंगाबाद) : कोटुंबिक वादातून पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना नायगव्हान (ता.फुलंब्री) येथील शेतवस्तीवर बुधवारी (5) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. कांताबाई दादाराव दाढे (वय 30) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. 

मिळालेल्या 
माहितीनुसार नायगव्हाण येथील दादाराव आण्णा दाढे हा पत्नी, दोन मुली, दोन मुलांसह शेतवस्तीवर राहत होता. बुधवारी रात्रीच्या सुमारास पती-पत्नीत वाद झाला. रागाच्या भरात दादारावने लाकडी दांड्याने केलेल्या मारहाणीत कांताबाई बेशुद्ध पडल्या. मारहाण झाल्यानंतर कांताबाईच्या मुलांनी याबाबत शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील कैलास पवार याबाबत वडोदबाजार पोलिसांना माहिती दिली. वडोदबाजार पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कांताबाई यांचा मृतदेह ताब्यात घेऊन वडोदबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आला आहे. पोलिसांनी दादाराव दाढे यास ताब्यात घेतले आहे.
 घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक आम्ले, ठसेतज्ञ पथक व श्वानपथकाने पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hingoli Fire Tragedy : हिंगोलीत फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; महिला आणि मुलासह दोघांचा मृत्यू, नगर परिषदेचे कर्मचारी गंभीर भाजले!

Viral Video : 'डोकंच नाहीये काही...' ईशान किशनचा रात्री १ वाजता विमानतळावर पारा चढला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

Sangli Crime : सांगलीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; गोकुळनगरात थरार

Mangalwedha News : भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री पदी सुदर्शन यादव यांची निवड

SCROLL FOR NEXT