बाळू मीठू गायकवाड  
मराठवाडा

सर्पदंशाने हिरावला कर्ता माणूस, शेतकरी कुटूंबावर दुःखाचा डोंगर

दीपक सोळंके

भोकरदन (जि. जालना) : झोपेत असताना अचानक विषारी सापाने हल्ला करून तरुण शेतकऱ्याला दंश केला. साप चावल्याने लक्षात येताच शेतकऱ्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, साप अधिक विषारी असल्याने उपचारादरम्यान शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना भोकरदन (Bhokardan) तालुक्यातील फत्तेपूर येथे बुधवारी (ता.22) रात्री ११ वाजता घडली. बाळू मीठू गायकवाड (वय 35) असे या घटनेत मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील फत्तेपूर येथील शेतकरी बाळू गायकवाड हे गावातील (Snake Bite) मारोती मंदिराजवळ राहायला आहे. बुधवारी रात्री ते जेवण करून नेहमीप्रमाणे झोपी गेले. रात्री 11 वाजेच्या सुमारास अचानक एका विषारी सापाने त्यांच्या पायावर दंश केला. साप चावल्याचे लक्षात येताच त्यांना भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना जालना येथे हलविण्यात आले असता. या ठिकाणी उपचार सुरू असतांना रात्री दीड वाजेच्या सुमारास (Jalna) त्यांचे निधन झाले. अचानक घडलेल्या या घटनेने शोककळा पसरली असून, ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून गुरुवारी सकाळी 11 वाजता फत्तेपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कर्त्या पुरुषाच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

बाळू गायकवाड हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कर्ता सदस्य होते. यापूर्वी त्यांच्या भावाचे अपघाती तर वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले होते. आता त्यांच्या अचानक मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले, दोन बहिणी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT