tuljapur tuljapur
मराठवाडा

तुळजापुरात भरदिवसा बसस्थानकाजवळ तरुणाचा खून; शहरात खळबळ

दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद बर्वे यांनी सदर युवकाच्या पोटावर गंभीर वार झाले होते असे सांगितले

जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (उस्मानाबाद): शहरात बसस्थानकाजवळ युवकाचा तीक्ष्ण हत्याराने खून झाल्याची घटना गुरूवारी (ता.29) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत युवकाचे नाव शंकर दाजी गायकवाड (वय 25) राहणार काक्रंबाचा (ता. तुळजापूर) आहे. येथील जुने एसटी बसस्थानक ते लातूर रोड या ठिकाणी असणाऱ्या गोदामासमोरील रस्त्यानजीक सदर युवकावर तीक्ष्ण हत्याराने पोटावर गंभीर स्वरूपाचे वार करण्यात आले. (crime news in tuljapur)

जखमी झालेल्या युवकाला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी गंभीर जखमी झालेल्या शंकर गायकवाड याच्यावर उपचार करण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. तथापि उपचारास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उपजिल्हा रुग्णालयात नागरीकांची मोठी गर्दी झाली होती.

पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद तसेच फौजदार चव्हाण यासह पोलिस कम॔चाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद बर्वे यांनी सदर युवकाच्या पोटावर गंभीर वार झाले होते असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात सलग सहाव्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात आजचा ताजा भाव किती? जाणून घ्या

फुल ड्रामा! तिसऱ्या अम्पायरने फलंदाजाला OUT दिले, सहकारी डग आऊडमध्ये 'आंदोलना'ला बसले; पुढे जे घडले त्याने सारेच चक्रावले

बँकेत बनावट नोटांचा ढीग! PNBच्या करन्सी चेस्टमध्ये १७ कोटींच्या खोट्या नोटा पोहोचल्या कशा? एका शंकेनं सगळा प्रकार उघडकीस

Mumbai News: 'बार्बेक्यू नेशन'मध्ये डेझर्टच्या प्लेटवर झुरळ; ग्राहकाकडून स्वच्छतेबाबत चिंता; व्हिडिओ व्हायरल

September 2026 Calendar: शिक्षक दिन, दहीहंडी, पोळा ते गणेशोत्सव; जाणून घ्या सप्टेंबर महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

SCROLL FOR NEXT