Latur News, Minor Girl Rape News
Latur News, Minor Girl Rape News  
मराठवाडा

मित्राच्या पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार, लातूर तालुक्यातील घटना

सकाळ वृत्तसेवा

लातूर  : शालेय जीवनापासून मित्र असलेल्या एका मित्राने मित्राच्याच पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना सोमवारी (ता.२५) उघड झाली. शाळेत शिक्षकांकडून मारायला लावेन, अशी धमकी देऊन त्याने मित्राच्याच घरात हा प्रकार केला. रविवारी (ता.२४) मुरूड (ता.लातूर) येथील पारूनगर भागात रात्री या घटनेत पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले, की मुरूड येथील पारूनगर भागातील एक तरुण व्यापारी व याच भागात राहणारा अक्षय महावीर बीडकर (वय २३) या दोघांची शालेय जीवनापासून मैत्री आहे. दोघांचे शिक्षण संपले तरी मैत्री कायम होती. या मैत्रीतूनच अक्षय नेहमी मित्राच्या घऱी जात होता.

कुटुंबांत अक्षयबाबत विश्वासाचे नाते होते. रविवारी रात्री साडेआठ वाजता अक्षय मित्राच्या घरी गेला. या वेळी मित्राची पाच वर्षांची मुलगी व मुलगा त्या ठिकाणी खेळण्यासाठी तिथे आले. घरातील बहुतांश लोक कामानिमित्त बाहेर गेले होते. याचा फायदा उठवत अक्षयने खोलीचा दरवाजा बंद करून शाळेतील शिक्षकांकडून तुला मारायला लावेन, अशी धमकी देऊन मुलीवर बलात्कार केला. या वेळी मुलगी व मुलगा ओरडू लागले. दोघांचा आवाज मुलीची आई अक्षय असलेल्या खोलीकडे धावली. या वेळी मुले रडत असल्याचे तिला ऐकू आले.

दरवाजा वाजवल्यानंतर आतून आरोपी अक्षय हा मुलांसह कडी उघडून बाहेर आला. त्या वेळी हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला नाही. सोमवारी सकाळी मुलगी झोपेतून उठल्यानंतर रडू लागली. विचारपूस केल्यानंतर मुलीने अक्षयने तिच्यासोबत केलेल्या किळसवाणा प्रकार सांगितला. यानंतर मुलीच्या आईसह कुटुंबांला मोठा धक्का बसला. आईने मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले व अक्षयविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने हालचाली करून अक्षयला अटक केली. त्याच्याविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी भेट देऊन चौकशी केली. पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन सुर्वे तपास करत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT