Manoj Jarange 
मराठवाडा

Manoj Jarange: परवानगी नसताना मनोज जरांगेंचे आजपासून उपोषण! पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष

Manoj Jarange in Antarwali Aarati: अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे शनिवारी 8 जून पासून सुरु होणाऱ्या आमरण उपोषणाला पोलीसांनी परवानगी नाकारली आहे.

कार्तिक पुजारी

जालना- मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे उपोषणावर ठाम आहेत. अंतरवाली सराटी येथे सभा घेण्यास पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. मात्र, जरांगे अंतरवाली सराटी येथे आजपासून उपोषण सुरू करणार आहेत. सगे-सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी जरांगे आजपासून उपोषण सुरू करतील.

अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे शनिवारी 8 जून पासून सुरु होणाऱ्या आमरण उपोषणाला पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षण करिता या ठिकाणी आठ महिन्या पासून आंदोलन, उपोषण करत आहेत. याआधीही जरांगे यांनी उपोषण केले आहे.

4 जून रोजी त्यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण होणार होते, परंतु 4 जून रोजी लोकसभा निवडणूक निकाल, आचारसंहिता आणि ग्रामस्थांनी उपोषणा विरोधात जालना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्याने पोलीसांनी उपोषणाला परवानगी नाकारली होती.

आचारसंहिता, निकाल यांचा मान ठेवून जरांगे यांनी 4 जून रोजीचे उपोषण पुढे ढकलले आणि 8 रोजी उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. अंतरवलीच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते, जरांगेच्या उपोषणामुळे जातीय सलोखा बिघडत असल्याचा दावा यात करण्यात आला होता. शांततेच्या पाश्वभूमीवर शनिवारी 8 जून रोजीच्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला शुक्रवारी 7 जून रोजी परवानगी नाकारली असल्याचे पोलीसांनी सांगीतले जाहीर केले होते.

मात्र मनोज जरांगे याच ठिकाणी उपोषण करण्यावर ठाम असल्याची माहिती मिळत होती. मनोज जरांगे पुढील दिशा काय ठरवतात, उपोषण अंतरवाली सराटी येथे होणार का या कडे राज्याचे लक्ष लागले होते. काही वेळातच त्यांचे उपोषण सुरु होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन यावेळी काय भूमिका घेतं हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Protest: कांद्याला भाव नाही, शेतकरी आक्रमक! पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात, चांदवडमध्ये रस्त्यावर रणकंदन

Kolhapur VIP Service: कोल्हापूरसह परराज्यातील तरुणींकडून व्हिआयपी सर्व्हिस, म्हैसाळमधील आलिशान बारवर छापा; नशेत धुंद तरुणांना घेतलं ताब्यात

Supreme Court Dowry Harassment Ruling : सासरच्यांनी सुनेला जुळवून घेण्यास सांगितल्यास गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश

Mumbai: तिसऱ्या मुंबईला ग्रीनफिल्डचा बुस्टर, नवी मुंबई ते पुणे नव्या एक्सप्रेसवेचा मोठा लाभ होणार; काय आहे प्रकल्प ?

Ichalkaranji IPL Betting : ऑनलाईन ‘आयपीएल’ सट्टेबाजी, झटपट पैशाचा नाद इचलकरंजीतील तरूणांचा कारनामा, ५८ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT