Manoj Jarange sakal
मराठवाडा

Manoj Jarange : मनोज जरांगे उपोषणावर ठाम ; उपचाराला नकार,अंमलबजावणीशिवाय उठणार नाही

‘‘मी वैद्यकीय उपचार घेणार नाही. मला झोपेत सलाईन लावू नका. सलाईन लावायचे असेल तर अगोदर अंमलबजावणी कधी करता ते सांगा. मायबाप समाज तुम्ही सरकारला धारेवर धरा.

सकाळ वृत्तसेवा

वडीगोद्री (जि. जालना) : ‘‘मी वैद्यकीय उपचार घेणार नाही. मला झोपेत सलाईन लावू नका. सलाईन लावायचे असेल तर अगोदर अंमलबजावणी कधी करता ते सांगा. मायबाप समाज तुम्ही सरकारला धारेवर धरा. मी एकटा मुंबईत जाऊन बसेन. अंमलबजावणी झाल्याशिवाय उठणार नाही. सरकारने त्वरित निर्णय घ्यावा. अंत पाहू नका. मी जर मेलो तर मला तसेच शासनाच्या दारात नेऊन टाका,’’ असे मनोज जरांगे यांनी बुधवारी (ता. १४) अंतरवाली सराटी येथे उपस्थित मोठ्या जनसमुदायाला सांगितले. यावेळी जरांगे यांनी त्यांना लावलेली सलाईन काढून फेकून दिली.

राजपत्रित अध्यादेश व मसुदा यांची अंमलबजावणी करावी, अधिवेशन घेऊन ‘सगेसोयऱ्या’बाबत कायदा मंजूर करावा, यासाठी शनिवारपासून (ता.१०) मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण करत आहेत.

रायगडावरून होणार घोषणा; अधिवेशन २० ला

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलाविण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. शिवजयंतीच्या मुहूर्तावर विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाची घोषणा करण्यास मुख्यमंत्री आग्रही होते.

मात्र शिवजयंतीला मतदारसंघांमध्ये नियोजित कार्यक्रम असल्याने अधिवेशनासाठी मुंबईत थांबणे गैरसोयीचे होईल, असा सूर बैठकीत लावण्यात आला. त्यामुळे शिवजयंतीला रायगडावरील कार्यक्रमात मराठा आरक्षणाची घोषणा करून दुसऱ्या दिवशी विशेष अधिवेशन घेतले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT