Manoj Jarange Esakal
मराठवाडा

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणांचं हत्यार; या तारखेपासून ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा सुरू करणार आंदोलन

Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं आहे. ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा उपोषण आणि आंदोलनाला सुरूवात करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशासह राज्यभरात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. आत्तापर्यंत चार टप्प्यातील मतदार प्रक्रिया पुर्ण झाली आहे. सर्वत्र राजकीय पक्षांचा निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका सुरू आहे. यादरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं आहे. ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा उपोषण आणि आंदोलनाला सुरूवात करणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे ४ जून रोजी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार आहेत. ८ जून रोजी नारायण गडावर ते सभा देखील घेणार आहेत. ‘सगेसोयरे‘साठी पुन्हा एकदा ते उपोषण आणि आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. मोदी महाराष्ट्रात इतक्या सभा घेत नव्हते पण यावेळी त्यांना मराठ्यांमुळे जिल्हा जिल्ह्यात सभा घ्याव्या लागल्या. मोदी हे गोधड्या टाकूनच महाराष्ट्रात होते. ही वेळ फडणवीस आणि त्यांच्या ४-५ लोकांमुळे आली असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. यासंबधीचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

जरांगे पुढे म्हणाले, आम्ही भाजप विरोधी नाही. सगेसोयरे आणि ओबीसी मराठा एकच असल्याचा जर अध्यादेश नाही काढला तर येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असंही त्यांनी म्हटलं आहे. जर सरकारने मान्य केले तर आम्ही राजकारणात पडणार नाही असंही ते पुढे म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT