Manoj Jarange Patil: sakal
मराठवाडा

Manoj Jarange Patil: फडणवीसांना मराठ्यांनी आमदार निवडून दिले, हे ते विसरले का? जरांगेंचा सवाल

Maratha Reservation: आरक्षणासाठी शिष्टमंडळाने काय केले?: मागण्यांवर ठाम असल्याचा पुनरुच्चार

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Latest Update: शासनाने आरक्षणाबाबत चर्चेसाठी अंतरवाली सराटीत वेळोवेळी शिष्टमंडळ पाठविले. या शिष्टमंडळाने काय केले, कोणता निर्णय घेतला, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी आज केला. मला राजकारण करायचे नाही, असे सांगत आरक्षण द्या, सगेसोयरेंबाबच्या निर्णयाची अंमलबजावणी करा, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या या मागण्यांचा त्यांनी पुनरुच्चार केला.

जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून (ता. २०) पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. ते म्हणाले, ‘‘यापूर्वी उपोषणादरम्यान चर्चेसाठी वेळोवेळी शिष्टमंडळ आले आणि फुकटात चहा पिऊन गेले.

त्यात त्यांना साखर असलेले बिस्कीट नको. खारे बिस्कीट हवे. पाणी पिऊन गेले. वीस रुपयाला पाण्याची बाटली असते. याची उधारी कुठून द्यायची? शिष्टमंडळ येते आणि माघारी फिरते.

शिष्टमंडळाने आतापर्यंत काय केले, हे विचारले का, असा सवाल करीत जरांगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. शिष्टमंडळाने आंदोलकांवरील एक तरी गुन्हा मागे घेतला का, मराठा आणि कुणबी एकच आहेत, याबाबतचा कायदा मंजूर केला का, कुणबी नोंदी शोधायचे काम का बंद केले, आदी प्रश्नांची सरबत्ती करत हे अजित पवार यांना दिसत नाही का. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला जे आरक्षण दिले, त्याबद्दल समाजाने त्यांचे १०५ आमदार निवडून दिले. हे ते विसरले का?’’असे सवाल त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate: मोठी बातमी! पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदीवर ९० दिवसांची बंदी; केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, पण कुणासाठी?

LPG Update: LPG गॅस संपणार का? 3 दिवसांत तब्बल 1.40 कोटी गॅस बुकिंग! तुटवड्याच्या चर्चांदरम्यान सरकारचं मोठं स्पष्टीकरण

Mahimangad Fort : शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक वारसा जपणारा 'महिमानगड' आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार; 'राज्य संरक्षित स्मारक' दर्जा मिळाल्यावर काय बदलणार?

Latest Marathi News Live Update : गर्भवती असल्याचा दावा करणाऱ्या आरोपीच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी

Latur Farmer: अधिकारी फोटो काढून गेले अन्... मदतीचा बैलही निघाला आजारी; लातूरच्या शेतकऱ्याच्या दु:खाला अंतच नाही!

SCROLL FOR NEXT