Manoj Jarange Patil sakal
मराठवाडा

Manoj Jarange Patil Maratha Reservation : मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव पण तरीही उपोषणावर ठाम , वैद्यकिय उपचाराला नकार

राजपत्रित अध्यादेश व मसुदा यांची अंमलबजावणी करावी ,अधिवेशन घेऊन सगे सोयरे बाबत कायदा पास करावा करीता शनिवार ता. 10 पासून मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहे

सकाळ वृत्तसेवा

वडीगोद्री : राजपत्रित अध्यादेश व मसुदा यांची अंमलबजावणी करावी ,अधिवेशन घेऊन सगे सोयरे बाबत कायदा पास करावा करीता शनिवार ता. 10 पासून मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहे जरांगे यांचा बुधवार ता.14 रोजी पाचवा दिवस आहे मनोज जरांगे यांनी वैघकिय उपचार घेण्यास पाचव्या दिवशी हि नकार दिल्याने त्यांची तब्बेत खालावली आहे.

मंगळवार ता.13 रोजी विभागीय आयुक्त महसूल मधुकरराजे आर्देड ,जिल्हाधिकारी श्री कृष्णनाथ पांचाळ , नारायण गडाचे मंहत शिवाजी महाराज यांनी भेट देऊन जरांगे यांना पाणी घेणे व वैघकिय उपचार घ्यावा करीता विनंती केली मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम राहीले.

बुधवार ता.14 रोजी सकाळ पासुन त्यांची तब्बेत जास्त खालावली आहे, त्यांच्या नाकातुन रक्तस्राव झाला असल्याचे उपस्थित नागरीक यांनी सांगितले समाज बांधव व समन्वयक लक्ष ठेवुन आहेत , जरांगे यांना पाणी घेणे व वैघकिय उपचार करणे बाबत सतत आग्रह केला जात आहे. या ठिकाणी आरोग्य केद्रातील कर्मचारी व पथक थांबलेले आहे. वडीगोद्री व परीसरात महाराष्ट्र बंदला पाठिंबा मिळत आहे, काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

-दिलीप दखने, वडीगोद्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शांतता कराराची घोषणा पण ट्रम्पसमोर इराणच्या ३ मोठ्या अटी, अमेरिका-इराण डीलमध्ये १४ मुद्दे महत्त्वाचे

Fifa World Cup 2026: ब्राझीलला बरोबरीचेच समाधान; मोरोक्कोसमोर पाच वेळच्या विजेत्यांचा कस, व्हिनिसियसच्या गोलने दिलासा

Pune Solapur Highway Traffic : पुणे-सोलापूर महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी, वाहनांच्या ६ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

Latest Marathi News Live Update : उन्हाळी सुटीनंतर राज्यातील ज्ञानमंदिरे आजपासून पुन्हा गजबजणार; चिमुकल्यांना पहिल्या दिवसाची उत्सुकता

Kasba Beed Gold Coins : शिलाहार राजवंशाची उपराजधानी असलेल्या कोल्हापूरच्या 'या' गावात पुन्हा सापडल्या सुवर्णमुद्रा! काय आहे अतिप्राचीन 'बेडा' आणि त्रिशूळाचे रहस्य?

SCROLL FOR NEXT