Manoj Jarange Patil sakal
मराठवाडा

Manoj Jarange Patil: तीनशे बैलगाड्या, शेकडो वाहनं लाखोंचा जनसमूदाय... बीडमध्ये आज मराठ्यांचा एल्गार, वाचा कसं आहे शांतता रॅलीच नियोजन

Beed Latest Update: लाखोच्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार; मराठा क्रांती मोर्चाची माहिती

नवनाथ इधाटे पाटील

Maratha Reservation: मराठ्यांची महाशांतता रॅलीचा समारोप १३ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात होणार आहे. या समारोप महाशांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी फुलंब्री मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करण्यात येत आहे.

तीनशे बैलगाडीसह वाहनांचा या रॅलीत सहभाग असणार आहे. प्रत्येक गावातून मोठा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. लाखोच्या संख्येने महाशांतता रॅलीत समाज बांधव सहभागी होणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.१०) सांगितले.

फुलंब्री तालुक्यातील गावागावात या जनजागृती अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून विविध प्रकारच्या वाहणांसह तीनशे बैलगाडीचे या मराठ्यांच्या महा शांतता रॅलीला जाण्यासाठी नियोजन करण्यात आले असून वडोद बाजार येथून मराठा समाज बांधवाची बुधवार रोजी पहीली बैलगाडीने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाली आहे.

13 जुलै रोजी जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या पाच तारखेपासून गावोगावी जाऊन रॅली सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये दररोज एक जिल्हा परिषद सर्कलची निवड करण्यात आली.

सकाळी ७ ते १० एक पंचायत समिती सर्कल व संध्याकाळी सहा ते नऊ एक पंचायत समिती सर्कल असे जनजागृती अभियानाच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. या जनजागृती अभियानास प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून रात्री अकरा वाजेपर्यंत गावागावात बैठका घेण्यात येत आहे.

समाज बांधव स्वखर्चाने सहभागी होणार

मराठ्यांच्या या शांतता रॅलीत स्वखर्चाने प्रत्येक गावातून किमान 500 महिला व नागरिक जाण्याचे नियोजन करण्यात आले असून सुमारे तालुक्यातून एक लाखाच्या वर मराठा समाज बांधव या रॅलीत सहभागी होणार आहे. या रॅलीत जाण्यासाठी कुणालाही वैयक्तिक वाहन देण्यात येणार नसून स्वखर्चाने ज्याला जसे जमेल तसे या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चा करत आहेत.

मुस्लिम व दलित समाजाचा पाठिंबा

प्रत्येक गावात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शांतता रॅलीसाठी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे विविध गावातील मुस्लिम, दलीत व इतर समाज बांधवांचा या जनजागृती अभियानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. बरेच ठिकाणी मुस्लिम व दलित बांधवांनी जाहीर सभेत भाषण करून मनोज जरांगे पाटलाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. 

...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT