Manoj Jarange Patil sakal
मराठवाडा

Manoj Jarange Patil: अमित शहांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही.. जरांगे पाटलांनी थेट भाजपच्या चाणक्याला घेतलं अंगावर

Maratha Reseration: आरक्षण देण्यासाठी कोणी रोखले मनोज जरांगे यांचा अमित शहांना सवाल

दिलीप दखने

Amit Shah: मराठा आरक्षणासाठी भाजपाला सत्तेवर आणा या अमित शहांच्या प्रश्नावर मनोज जरांगे यांनी आरक्षण देण्यासाठी तुम्हाला कोणी रोखले, सध्या सत्ता कोणाची आहे? आरक्षण देतो देतो म्हणून किती दिवस वाट पाहायची? गोर गरीब समाजाचा विचार करा व आरक्षण द्या. असे मनोज जरांगे यांनी सोमवार ता.22 रोजी अंतरवाली सराटी येथे सांगीतले. (we want Maratha reservation says manoj Jarange patil)

जरांगे हे पाचव्यांदा उपोषण करत असुन सोमवारी उपोषणाचा त्यांचा तिसरा दिवस आहे. या वेळी बोलतांना त्यांनी सांगितलं की, अमित शहा यांना गरीबाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही,त्यांना मराठा,गुर्जर, आदी मोठ्या जाती संपवायच्या आहेत.

सत्ता असुन आरक्षण मिळत नाही उलट आंदोलन दरम्यान लाठी हल्ला झाला, गोळीबार झाला, खोटे गुन्हे दाखल झाले. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले याची काय भूमिका आहे ,त्यांचा पाठींबा आहे का या पेक्षा तुम्हाला द्यायचे का नाही ते सांगा तुम्हाला फक्त मराठा समाजाचे मत पाहिजे भुजबळ शंभर टक्के दंगल घडवणार आहे शासनाने त्यांना समज द्यावी (Chhagan Bhujbal )

असा प्रश्न जरांगे यांनी शासनाला केला आहे.मुख्यमंत्री शिंदे व शरद पवार यांची भेट होणार आहे या बाबत विचारले असता दोघांना आरक्षणाचे काही घेण देण नाही त्यांचा काय निर्णय होते ते लवकरच कळेल . आमदरकीचा राजीनामा देतो या आ. प्रसाद लाड यांच्या वक्तव्य बाबत जरांगे यांनी सांगितले कि, लाड यांनी समाजाचा रोष घेऊ नये,मॅनेज करण्याचा प्रयत्न करू नये समाजाच्या बाजुने उभे राहीले पाहिजे असे सांगीतले.

तर येवल्यात उपोषण करणार

अंतरवाली सराटी येथे उपोषण चालू आहे, या भागात मंत्री छगन भुजबळ हे मुद्दाम ओबीसी चे आंदोलन घडवून आणत आहे, त्यांना असे करायचे असेल तर मी येवला,नाशिक येथे आंदोलन, उपोषण करणार परवानगी करीता अर्ज दिला आहे मग गर्दी कसी आसते तुम्हाला कळेल असा इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT