Manoj Jarange patil  
मराठवाडा

Manoj Jarane; लाडकी बहीण योजना म्हणजे सरकारने मराठ्यांविरोधात टाकलेला डाव, मनोज जरांगेंचा गंभीर दावा

Manoj Jarange patil says on ladki bahin yojana: तुम्हाला आम्हा सर्वांना येड्यात काढायचं आहे का? आता लाडकी मेहुणा किंवा मेहुणी योजना आणतील. तुम्हाला हेच करायचं आहे का? असा सवाल जरांगेंनी केला आहे.

कार्तिक पुजारी

जालना- मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचे नाही. धनगरांना आरक्षण द्यायचे नाही. मुस्लिमांना द्यायचे नाही. तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही. आता लाडका भाऊ, लाडकी बहीण योजना आणली आहे. तुम्हाला आम्हा सर्वांना येड्यात काढायचं आहे का? आता लाडकी मेहुणा किंवा मेहुणी योजना आणतील. तुम्हाला हेच करायचं आहे का? असा सवाल जरांगेंनी केला आहे.

तुम्हाला असले लफडे करायचे आहेत का? निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटायचे, निवडणुका संपल्या ही हे सर्व बंद पडणार. लोकांना रांगेत उभे केले जात आहे. रांगेत उभे केल्यानं काय होतं तुम्हाला माहिती आहे ना. गोरगरिबांना लक्षात येत नाही. त्यांना वाटतं सरकारने लाडकी योजना आणली. सरकार चांगलं आहे. त्यामुळे ते लढा विसरतात. या नादात रांग लागल्यामुळे तिथे लाडकी बहीण गेली, भाऊ गेला अन् आता लाडका भाऊ देखील जाईल, असं जरांगे म्हणालेत.

लाडकी बहीण योजनेमुळे साईट बंद पडल्यात. आपल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येत नाहीये. सरकार बधिर झालं आहे का? लाडकी बहीण योजनेमुळे साईटवर लोड आलाय. मेहुणीचे भरायचे की मेहुण्याचे फॉर्म भरायचे. सरकारने हा डाव टाकला आहे. बारा बलुतेदारांनी समजून घ्या. लाडकी बहीण योजनेमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास अडचणी येत आहेत. गर्दी झाल्यामुळे साईटच बंद झाली आहे, असा दावा जरांगेंनी केला आहे.

सरकारने विद्यार्थ्यांचे वाटोळं केलं. सरकारनं चांगलंच काम केलं असेल, माझा त्याला विरोध नाही. पण, पैसे दिले म्हणजे एकप्रकारचे तुम्ही मतदार विकत घेतले आहेत. एका खासदाराने देखील अशी आयडिया केली होती. मी नाव सांगणार नाही. ती महिला होती. साडी आणि मंगळसूत्र वाटायला सुरुवात केली होती. पण, निवडणुकीत तिचा पराभव झाला. लोकांनी शहाणे व्हावं, हे लोक खूप चालू आहेत, असं जरांगे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, Video: बुमराह आला अन् दुसऱ्याच बॉलवर विकेट घेतली! भुवनेश्वर कुमारच्या पंक्तीत मिळवलं स्थान

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? सौदीची पाइपलाइन बंद, फक्त ५ ते ७ दिवसांचा तेलसाठा शिल्लक

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

SCROLL FOR NEXT