manoj jarange patil says take decision before 20 feb 2024 maratha reservation protest Sakal
मराठवाडा

Manoj Jarange Patil : 20 तारखेच्या आत निर्णय घ्या नंतरचे आंदोलन माझ्या हातात नाही, मनोज जरांगे यांचा इशारा

Maratha Reservationशासनाने मागासवर्ग अयोगाचा अहवाल स्विकारला आहे विस तारखेला विधिमंडळाचे अधिवेशन घेतले जाणार आहे, या मध्ये अध्यादेश व सगे सोयरे बाबत कायदा पास करूण मराठा समाजाला टिकणारे आरक्षण शासनाने द्यावे

दिलीप दखने

वडीगोद्री : शासनाने मागासवर्ग अयोगाचा अहवाल स्विकारला आहे विस तारखेला विधिमंडळाचे अधिवेशन घेतले जाणार आहे, या मध्ये अध्यादेश व सगे सोयरे बाबत कायदा पास करूण मराठा समाजाला टिकणारे आरक्षण शासनाने द्यावे, शासनाने अध्यादेश ,मसुदा दिला मात्र अंमलबजावणी केली नाही त्यामुळे समाजाचा रोष आहे.

विस तारखेपर्यंत हा निर्णय झाला नाही तर त्या पुढील आंदोलन हे समाजाच्या हातात जाईल व याला शासन जबाबदार असेल असे अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषद मध्ये शुक्रवार (ता.16) रोजी मनोज जरांगे यांनी सांगितले.

जरांगे यांनी बोलतांना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे ,आयोगाच्या कामासाठी कर्मचारी नियुक्त केले ,समीतीला मुदतवाढ दिली ते नक्की सगे सोयरे बाबत कायदा पास करुण मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देतील , मराठा समाजाला आयोगाकडून ,

कुणबीमधुन , व सगे सोयरे या मधुन आरक्षण मिळणार आहे , शासनाने विस तारखेच्या आत दाखल गुन्हे वापस घ्यावे ,हैद्राबादचे गॅजेट स्विकारावे , सगे सोयरे बाबत कायद्याची अंमलबजावणी करावी , संस्थान ,मंदीर, भाट,

आदी ठिकाणच्या नोंदी स्विकारावे व शिंदे समीतीला मुदतवाढ द्यावी हे सर्व विस तारखेच्या आत करावे तो पर्यत माझे आमरण उपोषण थांबणार नाही. ता.20,21, तारखे नंतर होणारे आंदोलन हे माझ्या हातात नसुन ते समाजाच्या हातात आहे त्याची जबाबदारी हि शासनावर असेल आचार संहिता जरी लागली तरी अंमलबजावणी होण्यासाठी माझा लढा सुरूच राहणार आहे.

असे मनोज जरांगे यांनी सांगितले. समाज बांधव ,मा.न्यायालय यांचा आदर ठेवत मी वैघकिय उपचार घेत आहे , मुंबईला जाऊन फसवणुक झाली असे म्हणता येणार नाही अंमलबजावणित फसवनुक होत आहे असे म्हणावे लागले सरकारवर विस तारखेपर्यंत विश्वास असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओबीसी चा अभिमान आहे , नारायण राणे तुम्ही मराठा आहात तुम्हाला समाजाचा अभिमान पाहिजे ,

तुम्ही मध्ये बोलण्याचा ठेका घेतला का ?

तुम्ही समाजा कडुन बोलले पाहिजे ,आता पर्यंत तुम्ही पाच वेळा माझ्यावर टिका केली तुमचे वय झाले म्हणून तुमचा आदर केला आता या पुढे तुमची टिका सहन केली जाणार नाही तुम्हाला जसाच तसे उत्तर दिले जाईल, निलेश राणे तुम्ही त्यांना समजुन सांगा तर काहिना सतत नावे ठेवण्याचे काम आहे त्यांनी आता गप्प बसावे असि मंत्री भुजबळावर जरांगे यांनी टिका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT