Manoj Jarange  sakal
मराठवाडा

Manoj Jarange : ‘धनंजय मुंडेही आता जातीयवादात पुढे’

‘मंत्री धनंजय मुंडे हे प्रामाणिक आहेत. जातीयवाद करीत नाहीत, असे वाटले होते. मागील दोन-चार दिवसांत तेही पुढे आले आहे. मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात,’’ असा आरोप मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी केला.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : ‘‘मंत्री धनंजय मुंडे हे प्रामाणिक आहेत. जातीयवाद करीत नाहीत, असे वाटले होते. मागील दोन-चार दिवसांत तेही पुढे आले आहे. मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात,’’ असा आरोप मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी केला.

मराठ्यांनी शांत राहावे. त्यात आता पाचव्या टप्प्यातील मतदान असल्याने भावनिक होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. जरांगे म्हणाले, ‘‘गोपीनाथ मुंडे यांनी कधीही जातिवाद केला नव्हता. धनंजय मुंडेदेखील जातीयवाद करीत नव्हते, असे आम्हाला वाटत होते. मात्र, आता काही दिवसांपासून तेदेखील जातिवाद करत असल्याचे दिसून येत आहे.’’

‘‘मराठा समाजासाठी सगेसोयरेची अंमलबजावणी करा. असे झाले नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्यासह सर्व समाज मैदानात उतरणार असल्याचे जरांगे म्हणाले. सध्या आमचा कुणालाही पाठिंबा नाही. ज्याला पाडायचे त्याला पाडा, असे मी म्हणालो. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही थेट नाव घेऊन विरोध करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: पावसाचा हाहाकार अन् लोकलचा खोळंबा! मुंबईकरांनो वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, 'या' मार्गावर मेगाब्लॉक

Maharashtra Farmers: पीकविमा योजनेत डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक, चार प्रमुख बदल; फसवणूक केल्यास ५ वर्षे कोणताच लाभ नाही

Marathi Live Updates : सुकळी खिंडीत पाण्याचा महासागर; गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार! धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक; १२ तासात ७८७ मिमी पाऊस

Cabinet Reshuffle: ते दोन केंद्रीय मंत्री कोण? भाजप कार्यालयात पोहोचताच राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT