Manoj Jarange Patil 
मराठवाडा

Manoj Jarange Patil: सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, मागे हटणार नाही; मनोज जरांगेंचा बीडच्या सभेतून इशारा

यावेळी मनोज जरांगे सुरुवातीलाच छगन भुजबळ यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली. येवल्याचा येडपट असा उल्लेख त्यांनी केला.

Sandip Kapde

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेट उद्या संपणार आहे. आज जरांगे यांची बीड येथे इशारा सभा पार पडली. सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज आज बीड येथे जमला होता. या सभेनिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

यावेळी मनोज जरांगे सुरुवातीलाच छगन भुजबळ यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली. येवल्याचा येडपट असा उल्लेख त्यांनी केला.

शांततेत असलेल्या मराठा समाजाला डाग लावला. यांनी यांचेच हॉटेल जाळले आहेत. मात्र काहींनी आपल्यावर खोटा डाग लावला. मराठ्यांना राज्यात शांतता हवी. येवल्याच येडपट आलं अन् त्याच्या पाहुण्यांची त्यानेच हॉटेल जाळली, असा आरोप मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला. माझ्या नादी लागू नको मी लय बेकार माणूस आहे, अशा इशारा देखील जरांगेंनी दिला.

माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. इथं एक-एक वर्षाच्या लेकरांना माड्यांवर घेऊन माता माऊल्या बसल्या आहेत. मराठ्यांना आरक्षण द्या, एकट्याचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करु नका. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असे भुजबळ म्हणाले.
 

मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होत आहे, तसं करु नका, असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. तसं केलं तर पुढचं आंदोलन तुम्हाला जड जाईल, असे जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -

मी मॅनेज होत नाही हा सरकारचा प्रॉब्लेम आहे. मराठा समाजाला डिवचू नका

जो आपल्या बाजूनं तोच आपला नेता

प्रश्न मार्गी लावा, नाटकं कशाला करता, सरकारला इशारा

मी सरकारला अनेकदा वेळ दिला

मंत्री बधीरपणे वागत आहेत

२० जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT