Manoj jarange  sakal
मराठवाडा

Maratha Reservation : 'येणाऱ्या काळात समाज तुमच्याकडं दुर्लक्ष करेल, ते तुम्हाला परवडणार नाही'; मनोज जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे (Manoj Jarange) आपल्या उपोषणावर ठाम आहेत.

दिलीप दखने

शासनाने समाजाच्या आरक्षण मागणीकडे दुर्लक्ष करू नये. समाज तुमच्याकडे येणाऱ्या काळात दुर्लक्ष करेल ते तुम्हाला परवडणार नाही, असा इशारा जरांगे यांनी शासनाला दिला आहे.

वडीगोद्री : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे (Manoj Jarange) आपल्या उपोषणावर ठाम आहेत. त्यांचा आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे यांनी सांगितलं की, 'भेटायला जे येतात त्या आमदार, खासदार, मंत्री यांनी आरक्षणाची बाजू लावून धरावी.'

तसेच आज सरकारकडून मंत्री शंभूराज देसाई अंतरवाली सराटीत येणार आहेत, त्यांना येऊद्या. काय चर्चा करतात ते बघतो, काही निर्णय होतो का? शासनाची काय भूमिका आहे हे देसाई आल्यानंतर कळणार आहे. त्यानंतर समाजासोबत चर्चा करून पुढचा निर्णय व दिशा ठरवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शासनाने समाजाच्या आरक्षण मागणीकडे दुर्लक्ष करू नये. समाज तुमच्याकडे येणाऱ्या काळात दुर्लक्ष करेल ते तुम्हाला परवडणार नाही, असा इशारा जरांगे यांनी शासनाला दिला आहे. काल (बुधवार) बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगे यांची भेट घेतली आणि आरक्षणाचा प्रश्न सोडण्यासाठी खासदारांना एकत्र करून शासनाला निवेदन देणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT