Manoj Jarange Patil sakal
मराठवाडा

Manoj Jarange : मनोज जरांगे यांची 900 एकरांवरील सभा रद्द; काय आहे कारण?

बीडच्या ऐतिहासिक सभेची राज्यभर चर्चा होती. परंतु यंदा बीडवर भीषण दुष्काळाचं सावट आहे. पिण्यासाठी पाणी नाहीये. त्यामुळे सभेसाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय झाली असती, म्हणून सभा रद्द करण्यात आलीय.

संतोष कानडे

मुंबईः मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे यांची ८ जून रोजी बीडमध्ये होणारी सभा रद्द करण्यात आलेली आहे. तब्बल ९०० एक्करांवर होणाऱ्या या सभेची राज्यभर चर्चा होती.

बीडमध्ये सध्या दुष्काळाचं सावट आहे. त्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालेलं असून सभेसाठी येणाऱ्या लोकांची असुविधा होऊ नये म्हणून सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 'टीव्ही ९ मराठी'ने हे वृत्त दिले आहे.

मनोज जरांगे यांची ८ जून रोजी नारायणगडावर सभा होणार होती. या सभेला तब्बल ६ कोटी मराठा बांधव उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आता ही सभा रद्द करण्यात आलेली आहे.

बीडच्या ऐतिहासिक सभेची राज्यभर चर्चा होती. परंतु यंदा बीडवर भीषण दुष्काळाचं सावट आहे. पिण्यासाठी पाणी नाहीये, सभेसाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय होण्याची शक्यता होती. आता ही सभा जूननंतर होणार आहे.

दरम्यान, या सभेसाठी राज्यातूनच नाही तर परप्रांतातून देखील लोक येणार होते. आता पुढची सभा कधी होणार, याबाबत बैठक होणार आहे. जूननंतर सभा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheesh Mahal Delhi: दिल्लीतील 370 वर्षे जुने 'शीशमहाल' अखेर उघडले! जाणून घ्या तिकिट, वेळ आणि विशेष माहिती

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2025

मोठी बातमी! सोलापूर जिल्हा बॅंकेचे ६ शाखाधिकारी निलंबित; बनावट सोन्यावर दिले लाखोंचे कर्ज; माळशिरस, मंगळवेढा, सांगोल्यातील शाखांमधील धक्कादायक प्रकार

Panchang 11 July 2025: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

व्रत आरोग्याचे!

SCROLL FOR NEXT