Golu Pimple Sakal
मराठवाडा

Manwath News : चार वर्षीय मुलगा पडला बोरवेलमध्ये, वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

आई सोबत शेतात गेलेल्या चार वर्षीय मुलगा बोरवेलमध्ये पडल्याची घटना तालुक्यातील उक्कलगाव शिवारात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मानवत - आई सोबत शेतात गेलेल्या चार वर्षीय मुलगा बोरवेलमध्ये पडल्याची घटना तालुक्यातील उक्कलगाव शिवारात बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रशासन मुलाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे.

उक्कलगाव शिवारातील गट क्र. ९६ येथे सुनील कृष्णासा दगडू यांची शेती आहे. उक्कलगाव येथील अंकुशराव पिंपळे ही शेती बटईने पाहतात. बुधवारी या शेतात तुरीच्या पिकांची खुरपणी सुरू होती.

अंकुशराव पिंपळे यांच्या चार वर्षाच्या नातु गोलू सुरेश पिंपळे हा आजीसोबत शेतात आला होता. या शेतात बोरवेल उघड्या अवस्थेत होता. खेळताना बाहुली या बोरवेलमध्ये पडल्याने बाहुली काढण्याचा प्रयत्न करणारा गोलू बोरवेल मध्ये पडला. या बोरवेल मध्ये तो वीस फूट खोलीवर अडकून बसला आहे.

गोलू आवाजाला प्रतिसाद देत असुन, त्याने वरून सोडलेल्या दोरीला धरून ठेवले आहे. मुलाला बाहेर गाठण्यासाठी समांतर खोल खड्डा केला जात आहे. मुलाला बाहेर काढण्यासाठी सायंकाळी उशिरा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली असुन, गोलू सुखरूप बाहेर यावा यासाठी प्रार्थना करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJP-NCP Clash: भाजप नेते गणेश बिडकर यांचे सुनेत्रा पवारांना पत्र; अमोल बालवडकरांवर ‘अहंकारी, हेकेखोर’ आरोप, विकास निधी रोखल्याचा वाद पेटला

Pimpalvandi Protest: पिंपळवंडीतील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ जनसागर उसळला; नराधमाला २० दिवसांत फाशीची जोरदार मागणी

Mahagaon Rural Hospital: ‘सकाळ’च्या पाठपुराव्याला यश; महागाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांसह पाच अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Pune Civic Politics: बालवडकरांनंतर टिंगरेंवरही भाजपचा रोष; पत्रप्रकरणातून राष्ट्रवादी-भाजप संघर्षाला पुण्यात नवे चिघळले रूप

SCROLL FOR NEXT